22 July, 2024
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते सात पशुधन पर्यवेक्षकांना नियुक्तीपत्र
हिंगोली (जिमाका), दि. 22 : जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सात पशुधन पर्यवेक्षकांना नियुक्तीपत्राचे वाटप करण्यात आले.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुंभार, गणेश वाघ, जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजू एडके, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त यादवराव गायकवाड यावेळी उपस्थित होते.
पशुधन पर्यवेक्षक या पदाची 5 ऑगस्ट 2023 रोजी जाहिरात देऊन आयबीपीएस कंपनीमार्फत 17 ऑक्टोबर 2023 रोजी लेखी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल 16 फेब्रुवारी 2024 रोजी जाहीर करण्यात आला. त्यानंतर लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाल्यामुळे ही नियुक्ती थांबविण्यात आली होती. त्यामुळे आज जिल्हाधिकारी कार्यालयात श्रीमती अनुसया चंपती हमंद, अंकुश बाबुराव कदम, प्रमोद रमेश चऱ्हाटे, माधव बालाजी पाटील, विक्रम प्रकाश जाधव, सचिन बालाजी साखरे आणि प्रविण देवानंद पंचलिंगे या सात पशुधन पर्यवेक्षकांना नियुक्ती पत्र, पुष्पगुच्छ देऊन भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment