26 July, 2024

‘हिपॅटायटीस’ आजाराच्या शिबिरात 46 जणांच्या रक्त नमुन्यांची तपासणी • लसीकरण करुन घेण्याचे आवाहन

हिंगोली (जिमाका), दि. 26 : राष्ट्रीय आरोग्य अभियांनातर्गत राष्ट्रीय व्हायरल हिपॅटायटीस नियंत्रण कार्यक्रम हा सर्व जिल्ह्यांमध्ये सुरु करण्यात आला आहे. या कार्यक्रमांतर्गत राज्यात 4 आदर्श उपचार केंद्र व 32 उपचार केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे. या केंद्रामार्फत हिपॅटायटीस रुग्णांची तपासणी व औषधोपचार उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. हिंगोली जिल्ह्यातील जनतेला या कार्यक्रमामार्फत दैनदिन जीवनात वावरतांना हिपॅटायटीस आजारासंदर्भात वेळोवेळी रक्त तपासणी करावी व हिपॅटायटीस या आजाराचे लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस यांच्याकडून करण्यात येत आहे. हिपॅटायटीस या आजाराबद्दल समाजामध्ये जागरुकता निर्माण होण्यासाठी दरवर्षी 28 जुलै रोजी जागतिक हिपॅटायटीस दिन साजरा केला जातो. जागतिक आरोग्य संघटनेने यावर्षी "It's time for action’’ हे हिपॅटायटीस दिनाचे घोषवाक्य आहे. केंद्र शासन व राज्य शासनाच्या सूचनेनुसार हिपॅटायटीस दिनानिमित्त दि. 22 जुलैपासून 3 ऑगस्टपर्यंत हिपॅटायटीस पंधरवाडा साजरा करण्याबाबत सूचित केले आहे. या अनुषंगाने हिंगोली जिल्हा रुग्णालयात जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक हिपॅटायटीस पंधरवाडानिमित्त आज शुक्रवारी डायलेसिस विभागातील रुग्ण व त्यांचे नातेवाईक, डायलेसिस विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांची हिपँटायटीस बी आणि सीचे तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये रुग्ण, नातेवाईक व कर्मचारी असे एकूण 46 जणांच्या रक्त नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दीपक मोरे, आयसीयु विभाग प्रमुख तथा भिषक डॉ. नारायण भालेराव, रक्त संक्रमण अधिकारी डॉ. कंठे, डायलेसिस विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आऊलवार, डॉ. अंभोरे, चिफ मेट्रन चिंचकर, सहाय्यक मेट्रन श्रीमती आशा क्षीरसागर, डायलेसिस इन्चार्ज श्रीमती बीना जॉर्ज, एचएलएल जिल्हा व्यवस्थापक घुगे आदी उपस्थित होते. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी जिल्हा समन्वयक लक्ष्मण गाभणे, एजाज पठाण, अरविंद कदम, संतोष गिरी, परिचारिका श्रीमती जिजा रूंजे, श्रीमती प्रिती काकडे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ व्ही. एस.आंबटवार, आश्विनी मुंढे, मुकींद शिंदे, कैलास गवळी, सुंदरलाल राठोड, कार्यालयीन कर्मचारी व रुग्णालयीन अधिपरिचारीका इत्यादींनी परिश्रम घेतले. *******

No comments: