09 July, 2024
ठक्करबाप्पा आदिवासी वसती सुधार योजनेसाठी 31 जुलै पर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 09 : सन 2022-23 या वर्षापासून ठक्करबाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजनेच्या सुधारित मार्गदर्शक सुचनेनुसार योजना अंमलबजावणीसाठी शासन स्तरावरुन दि. 3 फेब्रुवारी, 2023 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. त्यानुसार सन 2024-25 साठी जिल्हास्तर व राज्यस्तर ठक्कर बाप्पा प्रस्ताव एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयामार्फत स्वीकारण्यात येणार आहेत.
हिंगोली व परभणी जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी यांनी त्यांच्या कार्यालयाच्या अधिनस्त येत असलेल्या ग्रामपंचायतनिहाय उपरोक्त शासन निर्णयातील विवरणपत्र एक मध्ये नमूद विविध कामांपैकी आर्थिक मर्यादेचया अनुषंगाने कामांचा प्राधान्यक्रम ठरवून तसेच तहसीलदार, गटविकास अधिकारी यांच्या एकूण लोकसंख्येपैकी आदिवासी लोकसंख्या व क्षेत्र प्रमाणपत्र, कामांचा पाच वर्षांचा प्राधान्यक्रम आराखडा (अंदाजित किंमत), प्रस्तावित कामाचे तत्वत: मान्यता प्राप्त अंदाजपत्रक, ग्रामपंचायतचा प्रस्तावित कामाचा बहुमताने पारीत झालेला ठराव, काम करण्यासाठी ग्रामपंचायतचे नाहरकत प्रमाणपत्र, कामाचा स्थळदर्शक नकाशा, प्रस्तावित करण्यात येणाऱ्या जागेचे फोटो (जीओ टॅगचे फोटो), प्रस्तावित काम इतर योजनेंतर्गत यापूर्वी घेण्यात आले नसल्याचे प्रमाणपत्र, ग्रामपंचायतीचे देखभाल दुरुस्तीचे प्रमाणपत्र, काम करावयाची जागा ग्रामपंचायतच्या नावे असल्याचा पुरावा (आठ अ), ग्रामसेवक यांचा अहवाल, कार्यान्वयीन यंत्रणेचे प्रमाणपत्र, अंदाजपत्र (तांत्रिक मान्यतेसह) इत्यादी कागदपत्रांसह विविध कामाचे प्रस्ताव तयार करुन प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळमनुरी हि.हिंगोली येथे दि. 31 जुलै, 2024 पूर्वी सादर करावेत, असे आवाहन प्रकल्प अधिकारी यांनी केले आहे.
*******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment