09 July, 2024
पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेसाठी तात्काळ अर्ज सादर करण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 09 : जिल्ह्यातील सर्व मान्यता प्राप्त तंत्र शिक्षण तसेच व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमात प्रवेशित धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना सन 2019-20 या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता 12 वी नंतरच्या मान्यता प्राप्त तंत्र शिक्षण तसेच व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयामध्ये केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेतलेल्या परंतु शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना भोजन, निवास व शैक्षणिक साहित्यासाठी त्यांच्या आधारसंलग्न बँक खात्यामध्ये थेट रक्कम वितरीत करण्यासाठी पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना सुरु करण्यात आलेली आहे. या योजनेच्या लाभार्थी निवडीचे निकष पुढीलप्रमाणे आहेत.
विद्यार्थी धनगर समाजातील असावा. इयत्ता बारावीमध्ये किमान 60 टक्के गुण मिळालेले विद्यार्थी या योजनेस पात्र राहतील. योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी संबंधित विद्यार्थ्यांने इयत्ता बारावी नंतर मान्यता प्राप्त तंत्र शिक्षण तसेच व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयामध्ये केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेतलेला असावा. विद्यार्थ्यांने अर्जासोबत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील. विद्यार्थ्यांच्या पालकाचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे. विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या शहराच्या ठिकाणी आहे, अशा शहरातील विद्यार्थी रहिवाशी नसावा. हिंगोली शहरातील महाविद्यालयामध्ये शिक्षण घेणारा असावा. धनगर समाजातील अपंग विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ प्राधान्याने देय राहील. लाभार्थी निवड प्रक्रिया खालील वेळापत्रकानुसार राबविण्यात येणार आहे.
उच्च शिक्षणाचे द्वितीय, तृतीय व चतुर्थ वर्षात शिक्षण घेत असलेल्या लाभार्थ्यांना 25 जुलै, 2024 पर्यंत अर्ज सादर करता येणार आहे. याची निवड यादी दि. 5 ऑगस्ट, 2024 रोजी जाहीर करण्यात येणार आहे. उच्च शिक्षणाचे प्रथम वर्षात शिक्षण घेत असलेल्या लाभार्थ्यांना दि. 5 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट, 2024 पर्यंत अर्ज सादर करता येणार आहे. याची निवड यादी दि. 2 सप्टेंबर, 2024 रोजी जाहीर करण्यात येणार आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित विद्यार्थ्यांस ऑफलाईन पध्दतीने सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, हिंगोली यांच्याकडे तात्काळ अर्ज सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक संचालक यादव गायकवाड यांनी केले आहे.
*******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment