28 July, 2024

मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप शिबिराचे आयोजन

हिंगोली (जिमाका), दि. २८ : उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, हिंगोली व शासकीय जिल्हा रूग्णालय, हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने एसटी डेपो, हिंगोली येथे दि. २७ जुलै रोजी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . यात एसटी बस चालक व तसेच हिंगोली जिल्ह्यातील खाजगी शाळा बस चालक व ड्रायव्हिंग स्कूल तसेच चालक संघटना अंतर्गत माल वाहतूक करणारे चालक यांची मोफत नेत्र तपासणी करून त्याना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात नेत्र रोग तज्ञ डॉ.लखमावार, अजय खाडे (opthalphic ऑफिसर ), आगार व्यवस्थापक थोरबोले, आरटीओ अधिकारी शैलेशकुमार कोपुल्ला, आशिक तडवी, विकास नाईकवाडी, विजय दिघे, प्रमोद गोटे, आशिष दाताळ ,पुष्कराज पारशेट्टे, अतुल बाणापुरे, लिपिक गजानन बंदुके व कार्यालयाचे चालक इत्यादी व दत्तकृपा ऑप्टिकल्सचे श्री. घुगे उपस्थित होते. *******

No comments: