22 July, 2024
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेतील गावांचा आढावा
हिंगोली (जिमाका), दि. 22 : जिल्ह्यातील आठ गावात राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेतील विकासकामांचा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आढावा घेतला.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुंभार, गणेश वाघ, जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजू एडके, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त यादवराव गायकवाड, गटविकास अधिकारी, संबंधित गावचे सरपंच आणि ग्रामसेवक उपस्थित होते.
प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेमध्ये हिंगोली तालुक्यातील कलगाव, लिंबाळा प्र.वा., सागद, देवठाणा व देऊळगाव रामा, वसमत तालुक्यातील पांगरा सती, गुंज व कौडगाव, कळमनुरी तालुक्यातील देवजना, पुयना, तुप्पा व किल्ले वडगाव, सेनगाव तालुक्यातील केंद्रा बु., ताकतोडा, शिंदेफळ व पिंपरी लिंग गावांचा समावेश आहे.
यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेंतर्गत सन 20217-18 मध्ये समाविष्ट असणाऱ्या गावातील कामांच्या सद्यस्थितीचा तसेच सन 2022-23 मध्ये समाविष्ट असणाऱ्या गावांचा गाव विकास आराखडा यांचा आढावा घेण्यात आला. संबंधित गावामध्ये फेवर ब्लॉक, भूमिगत गटारी, पाणीपुरवठा योजनेची कामे यासह विविध करण्यात येणाऱ्या विकास कामाचा आराखडा त्वरित सादर करावा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
*******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment