11 July, 2024

जिल्ह्यात विविध ठिकाणी जागतिक लोकसंख्या दिन साजरा • लोकसंख्या दिनानिमित्त केल्या 26 कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया यशस्वी

हिंगोली (जिमाका), दि. 11 : जिल्ह्यात विविध ठिकाणी जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यात आला . आज दि. 11 जुलै 2024 गुरुवार रोजी जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त उपजिल्हा रुग्णालय कळमनुरी, वसमत व ग्रामीण रुग्णालय आखाडा बाळापूर येथे विशेष कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबिरे घेण्यात आली. या शिबिरात कोविड नियमांचे पालन करून दि. 10 जुलै रोजी रुग्णांची भरती करून सर्व रक्त तपासणी, शस्त्रक्रिया पूर्व तपासणी करण्यात आली. तर आज जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त ग्रामीण रुग्णालय आखाडा बाळापूर येथे सर्जन डॉ. कतृवार यांनी 7 कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या केल्या. तर उप जिल्हा रुग्णालय वसमत येथे सर्जन डॉ. रमेश भोले यांनी 5 कुटुंब कल्याण स्त्री शस्त्रक्रिया बिना टाका तर उपजिल्हा रुग्णालय कळमनुरी येथे सर्जन डॉ. डी. व्ही. सावंत तालुका आरोग्य अधिकारी कळमनुरी यांनी 14 अशा एकूण 26 स्त्रियांची कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या केल्या. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांनी आखाडा बाळापूर व उपजिल्हा रुग्णालय कळमनुरी येथील कुटुंब कल्याण शिबिरास भेट देऊन पाहणी करत रुग्णांची विचारपूस केली. सदरील शिबिर मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी अधिकारी डॉ. कैलास शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त जिल्हा श. चि. डॉ दीपक मोरे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलजा कुप्पास्वामी, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. सुनील देशमुख, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विठ्ठल करपे, डॉ. काळे यांनी नियोजन करून डॉ . दिशांकी गुरडवार ,डॉ. संदीप शिंदे, डॉ शेषराव नरवाडे, डॉ. प्रिया नाकाडे, डॉ. आनंद मेने, डॉ. बेडेवार व परिसेविका श्रीमती तागड, अधीपरिचारिका प्रियंका सिरसाट, झरकर, लोखंडे, शिपाई पतंगे, राजू बरगे, सत्व शिला, रमा , बेबीबाई इत्यादी कर्मचारी यांनी शिबीर यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. *******

No comments: