08 July, 2024

वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

हिंगोली (जिमाका), दि. 08 : इतर मागास बहुजन कल्याण विभाग अंतर्गत सहायक संचालक इतर मागास बहुजन कल्याण विभाग हिंगोली यांच्या अधिनस्त मुलींचे शासकीय वसतिगृह अंतुलेनगर हिंगोली तसेच मुलांचे वसतिगृह अकोला बायपास रोड बळसोंड हिंगोली येथील इमारतीत सुरु करण्यात आलेले आहे. या वसतिगृहात सन 2024-25 या शैक्षणिक सत्रात व्यवसायिक व बिगर व्यवसायिक शिक्षणासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी ऑफलाईन प्रवेश प्रक्रियेसंदर्भात 21 जुलै, 2024 पर्यंत अर्ज वाटप व स्वीकार करण्याचे काम सहायक संचालक इतर मागास बहुजन कल्याण विभाग, शासकीय रुग्णालयाच्या पाठीमागे, दर्गा रोड, हिंगोली येथे सुरु झाले आहे. इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील व्यावसायिक व बिगर व्यावसायिक प्रवर्गातील शिक्षण घेणाऱ्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज सादर करावेत, असे आवाहन सहायक संचालक यादव गायकवाड यांनी केले आहे. ***

No comments: