01 July, 2024
आयटीआय प्रवेशासाठी 3 जुलैपर्यंत मुदतवाढ
हिंगोली, (जिमाका) दि. ०१: यावर्षी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वसमत येथे प्रवेश प्रक्रियेतील ऑनलाईन अर्ज भरून नजीकच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये भरलेला फॉर्म दुरुस्त करणे व प्रवेश शुल्क जमा करण्याचा ३० जून 2024 हा अंतिम दिनांक होता. त्यात 3 जुलै 2024 पर्यंत मुदतवाढ करण्यात आली आहे. तसेच सुट्टीच्या दिवशीसुद्धा सर्व आयटीआय चालू असून प्रवेश अर्ज कन्फर्म करण्याचे काम चालू आहे.
तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आयटीआयला फॉर्म भरून अर्ज भरण्याचे आवाहन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्राचार्य एस. एल. कोंडावार यांनी केले आहे.
कमी वेळेत कमी खर्चात खात्रीशीर झटपट नोकरी किंवा स्वयंरोजगार उपलब्ध करून देणारे शिक्षण म्हणून आयटीआयकडे पाहिले जाते. यावर्षी 2.5 लाख विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज भरलेले आहेत.
दिवसेंदिवस औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेण्यात वाढ होत असून इलेक्ट्रिशियन, वायरमन आदि अभ्यासक्रमाला 20 प्रवेश क्षमता असून, एका तुकडीसाठी 280 अर्ज प्राप्त झाले आहेत.
000000
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment