30 July, 2024
कळमनुरी आयटीआयमध्ये तासिका तत्वावर निदेशक पदासाठी मुलाखतीचे आयोजन
हिंगोली (जिमाका), दि. 30 : औद्योगिक प्रशिक्षण संस्था कळमनुरी जि.हिंगोली या संस्थेतील इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक या व्यवसायातील प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरींग मधील पदवी, पदविका तसेच इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक हा व्यवसाय घेऊन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून उत्तीर्ण झालेल्या व त्यानंतर सीआयटीएस पूर्ण केलेल्या पात्रताधारक व शिकवण्याचा अनुभव असलेल्या उमेदवारांची तासिका तत्वावर (Clock Hour Basis) निव्वळ तात्पुरत्या स्वरुपातील पद भरण्यासाठी संस्थेत येऊन बायोडाटासह अर्ज करावेत, असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यांनी केले आहे.
मुबलक प्रमाणात अर्ज प्राप्त झाल्यास दि. 8 ऑगस्ट, 2024 रोजी मुलाखतीचे आयोजन करुन निवड करण्यात येणार असल्याचे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यांनी कळविले आहे.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment