29 July, 2024
हिंगोली जिल्ह्यात सरासरी 7 मिमी पाऊस
हिंगोली (जिमाका), दि. 29 : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 7.10 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, सेनगाव तालुक्यात सर्वात जास्त 11.60 मि.मी. पाऊस झाला आहे. तर वसमत तालुक्यात सर्वात कमी 4 मि.मी. पाऊस पडला आहे.
जिल्ह्यात आज सकाळपर्यंत नोंदला गेलेला तालुकानिहाय सरासरी पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी 1 जूनपासून आजपर्यंत झालेल्या पावसाची आहे. हिंगोली 5.70 (455.70), कळमनुरी 10.20 (425.70), वसमत 4 (388.10), औंढा नागनाथ 4.60 (390.80) आणि सेनगाव तालुक्यात 11.60 (392.30) मि. मी. पाऊस पडला आहे. सर्व आकडेवारी मिलीमीटर परिमाणात आहे.
हिंगोली जिल्ह्यात दिनांक 1 जून 2024 ते 29 जुलै 2024 पर्यंत सरासरी 412.20 मिलीमीटर पाऊस पडला आहे. त्याची टक्केवारी 51.83 अशी आहे.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment