19 July, 2024
डिसेंबर अखेरचे ईआर-1 त्रैमासिक विवरणपत्र 31 जुलै पर्यंत सादर करण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 19 : सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये तसेच खाजगी आस्थापनांनी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली यांच्याकडे आपल्या आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांची माहितीबाबतचे माहे जुन,2024 अखेरचे ईआर-1 त्रैमासिक विवरणपत्र www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर दि. 31 जुलै, 2024 पर्यंत ऑनलाईन भरावेत. माहे जुलै-2024 ची मासिक वेतन देयके दाखल करताना ईआर-1 भरुन दिल्याचे ऑनलाईन प्रमाणपत्र देयकासोबत जोडणे आवश्यक आहे. याशिवाय मासिक वेतन देयके व इतर कोणतेही देयके स्वीकारले जाणार नाहीत याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.
तसेच सर्व कार्यालयांना जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,हिंगोली या कार्यालयामार्फत युजर आयडी व पासवर्ड यापूर्वीच कळविण्यात आलेले आहेत. त्यानुसार सर्व कार्यालयानी आपला ई-मेल पत्ता, दूरध्वनी क्रमांक, पत्ता, टॅन क्रमांक, पॅन क्रमांक टाकून आपली प्रोफाईल अद्यावत करावी, असे आवाहन सहायक आयुक्त , कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, हिंगोली यांनी केले आहे.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment