24 July, 2024

होमगार्डमध्ये सेवा करु इच्छिणाऱ्या उमेदवारांनी नोंदणीसाठी अर्ज करावा

हिंगोली (जिमाका), दि. 24 : हिंगोली जिल्हा होमगार्ड मधील रिक्त असलेल्या 96 जागा भरण्यासाठी दि. 16 ऑगस्ट, 2024 पासून होमगार्ड नोंदणीचे आयोजन येथील संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर करण्यात आले आहे. त्यासाठी दि. 14 ऑगस्ट, 2024 अखेर ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. होमगार्ड नोंदणीचे माहितीपत्रक, नियम व अटी याबाबत विस्तृत माहिती https://maharashtracdhg.gov.in/mahahg/login1.php या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. होमगार्डमध्ये सेवा करु इच्छिणाऱ्या हिंगोली जिल्ह्यातील रहिवाशी असलेल्या उमेदवारांनी नोंदणीसाठी अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा समादेशक तथा अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांनी केले आहे. ********

No comments: