15 July, 2024

सोयाबीनसह इतर पिकांच्या आधारभूत दरासाठी 'ई समृद्धी'वर पूर्व नावनोंदणी करण्याचे शेतक-यांना आवाहन

हिंगोली, दि.१५ (जिमाका): महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ, मुंबई व नाफेड यांच्या संयुक्त विद्यामाने दरवर्षीप्रमाणे हंगाम २०२४-२५ मध्ये ही राज्यात केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार नाफेडमार्फत मका, तूर, चना, मूग, उडीद व सोयाबीन खरेदी करण्यात येणार आहे. नाफेड कार्यालयाने गृह आणि सहकार मंत्री यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी eSamriddhi पोर्टल सुरू केले असून, नाफेडमार्फत राबविण्यात येणाऱ्या सरकारी योजनांचा लाभ राज्यातील सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावा व जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ईसमृद्धी पोर्टलवर नोंदणी करुन आपल्या शेतमालाला योग्य दर घ्यावा. शेतक-यांच्या वरील कृषीमालाची नोंदणी करण्यासाठी या पोर्टलची निर्मिती करण्यात आली आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी QR कोड Scan करून अथवा https://esamridhi.in/#/login या संकेतस्थळाला भेट देत आपल्या शेतमालाची एमएसपी दराने विक्री करण्यासाठी ई-समृद्धी पोर्टलवर खरेदी Pre-registration करावे व केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी कुंडलिक शेवाळे यांनी केले आहे. ई-समृध्दी पोर्टलवरील नोंदणीच्या अडचणीबाबत व अधिक माहितीसाठी जिल्हा पणन अधिकारी कुंडलिक शेवाळे (8108182948), कार्यालयाचे प्रतिनिधी श्रीधर कानडे (9561717175) यांच्याशी संपर्क साधण्याचे प्रसिद्धीपत्रकाव्दारे आवाहन करण्यात आले आहे.

No comments: