29 July, 2024

जिल्ह्यात नवीन तुती लागवडीला रेशीम उपसंचालक महेंद्र ढवळे यांच्या हस्ते सुरुवात

हिंगोली (जिमाका), दि. 29 : जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील नागेशवाडी येथील शेतकरी उत्तम नाईक यांच्या शेतात रेशीम उपसंचालक महेंद्र ढवळे यांच्या हस्ते नवीन तुती लागवडीला नुकतीच सुरुवात झाली. रेशीम उपसंचालक महेंद्र ढवळे यांनी हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता जिल्ह्यातील तुती लागवडीचा, मनरेगा कामकाजाचा आढावा घेऊन नवीन तुती लागवड होऊ घातलेल्या सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच नागेशवाडी येथील सर्व 10 शेतकऱ्यांच्या कामकाजाचा आढावा घेऊन रेशीम शेती ही इतर पिकापेंक्षा कशा पध्दतीने चांगली आणि जास्त उत्पन्न देणारी आहे, हे सांगण्यात आले. यावेळी नवीन तुती लागवड कशा पद्धतीने करावी याचे प्रात्यक्षिक दाखवून उत्तमराव नाईक यांच्या शेतात भर पावसात तुती लागवड सुरू करण्यात आली. याप्रसंगी जिल्हा रेशीम विकास अधिकारी प्रमोद देशपांडे, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक अशोक वडवळे, गजानन काचगुंडे तसेच रंगनाथ जांबुतकर, राजु रणवीर, रजनीश कुटे, कुलदीप हरसुले, केतन प्रधान, कु.राधा पाटील व रमेश भवर, तान्हाजी परघणे, प्रगतशील शेतकरी सुरेश भोसले, कपील सोनटक्के दिपक शिंदे, श्रीधर शृंगारे, धनाजी सारंग आदी शेतकरी उपस्थित होते. ******

No comments: