19 July, 2024

साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

हिंगोली (जिमाका), दि. 19 : सन 2023-24 या शैक्षणीक वर्षात 10 वी, 12 वी,पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी इत्यादी अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना सरासरी 60 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त टक्केवारी गुण, प्राप्त झाले असतील, अशा उत्तीर्ण झालेल्या मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील विद्यार्थ्यांना/विद्यार्थीनींना महामंडळाकडून ज्येष्ठता व जास्त गुण क्रमांकानुसार जिल्ह्यातील प्रथम 03 ते 05 विद्यार्थ्यांस उपलब्ध निधीच्या अधिन राहून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येते. त्यामुळे दिनांक 24 जुलै, 2024 पर्यंत कार्यालयीन वेळेत संपूर्ण कागदपत्रानिशी मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील विद्यार्थ्यांनी जिल्हा कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक, टि.आर.शिंदे यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये केले आहे. तसेच उशिरा आलेल्या कागदपत्र अर्जाचा स्विकार करण्यात येणार नाही, असेही प्रसिध्दीपत्रकात नमुद आहे. खालीलप्रमाणे मुळ कागदपत्रे दोन प्रतीसहित सोबत आणावीत : यामध्ये मार्कशिट, शाळा सोडल्याचा दाखला, रेशन कार्ड, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, आधारकार्ड, दोन फोटो, पुढच्या वर्गात प्रवेश घेतल्याची पावती किंवा बोनाफाईड सर्टिफिकेटसह व जिल्हा व्यवस्थापकांच्या नावे शिष्यवृत्ती मागणीचा अर्ज. *****

No comments: