10 July, 2024

दुर्धर आजारावरील उपचाराच्या लाभासाठी पात्र दिव्यांगांनी 25 जुलैपर्यंत अर्ज करावेत

हिंगोली (जिमाका), दि. 10 : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दिव्यांगाना दुर्धर आजाराच्या उपचारासाठी अर्थसहाय्य या योजनेसाठी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागांकडे पंचायत समितीमार्फत अर्ज मागविण्यात येत आहेत. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील दुर्धर आजाराने त्रस्त असलेल्या व 40 किंवा त्यापेक्षा जास्त टक्के दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र असणाऱ्यांना आजारावरील उपचारासाठी 25 हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे. दुर्धर आजारामध्ये कॅन्सर, मेंदुविकार, क्षयरोग, हृदय शस्त्रक्रिया, किडनी, यकृत आजार, कुष्ठरोग, अर्धांगवायु, थॅलासिमिया, सिकलसेल, ॲनामिया, डायबिटीस या अजारांचा समावेश आहे. पात्र दिव्यांगानी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पंचायत समिती मार्फत दि. 25 जुलैपर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी आर. एच. एडके यांनी केले आहे. ***

No comments: