नगरपरिषद निवडणुकांसाठी
जिल्ह्यात कलम 144 लागू
हिंगोली, दि. 25 : जिल्ह्यातील नगर परिषद हिंगोली, वसमत व कळमनुरी
सार्वत्रिक निवडणुक, 2016 ची प्रक्रिया जिल्ह्यात ज्या ठिकाणी मतदान व मतमोजणी होणार
आहे. त्या मतदान केंद्राच्या ठिकाणी दिनांक 27 नोव्हेंबर, 2016 चे सकाळी 7.00 वाजेपासुन
ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत मतदान होणार असून मतमोजणी दिनांक 28 नोव्हेंबर, 2016 रोजी
मतमोजणीच्या ठिकाणी सकाळी 7.00 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता
1973 चे कलम 144 लागु करण्यात येत असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी, हिंगोली
यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.
नगर
परिषदेचे नांव, मतमोजणीचे ठिकाण व मतदान केंद्राची संख्या पुढीलप्रमाणे आहे. 1) हिंगोली,
कल्याण मंडप, हिंगोली - 91, 2) वसमत, औद्योगीक प्रशिक्षण संस्था, वसमत - 64, 3) कळमनुरी,
नगर परिषद कार्यालय, कळमनुरी - 28.
उपरोक्त
नमुद ठिकाणी 100 मिटरच्या परीसरात व्यक्तीच्या समुहास मुक्त संचार प्रवेशावर निर्बंध
घालण्यात येत आहे. सदरील आदेश राज्य निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेले निवडणूक निर्णय
अधिकारी यांचे कार्यालय परिसर व मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात व्यक्तीच्या समुहास
मुक्त संचार प्रवेशावर निर्बंध घालण्यात येत आहेत. सदरील आदेश निवडणुक निर्णय अधिकारी
यांनी प्राधिकृत केलेले अधिकारी / कर्मचारी व मतदान केंद्राच्या परिसरातील मतदारास
लागु होणार नाहीत. मतदान केंद्राच्या परिसरात व मतमोजणीच्या ठिकाणी 100 मिटरच्या आत
खाजगी वाहन घेऊन जाण्यास निर्बंध घालण्यात येत आहेत.
*****
No comments:
Post a Comment