08 November, 2016

क्रीडा विभागाच्या विविध योजनेच्या अनुदानासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
हिंगोली, दि.08:  क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, हिंगोली यांच्याव्दारे सन 2016-17 या आर्थिक वर्षासाठी युवक कल्याण व क्रीडांगण विकास योजना (सर्वसाधारण/विशेष घटक) प्रस्ताव स्विकारण्यात येत असून दि. 09 ते 19 नोव्हेंबर 2016 या कालावधीत कार्यालयीन वेळेत अर्ज विक्री व प्रस्ताव स्विकारणे सुरु असून दि. 19 नोव्हेंबर 2016 नंतर प्राप्त होणा-या प्रस्तावांचा विचार करण्यात येणार नाही. 
गतवर्षी शिल्लक राहिलेल्या प्रस्तावाना प्रथम प्राधान्य देण्यात येणार असून यानंतरच नवीन परिपुर्ण प्रस्तावांचा विचार केला जाणार आहे. याची नोंद संस्था, क्रीडा मंडळे अध्यक्ष/सचिव व सभासदांनी घ्यावी असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. नरेंद्र पवार यांनी केले आहे.

***** 

No comments: