गोळीबार
सरावासाठी मैदान ( फायर बट ) ची उपलब्धता
हिंगोली, दि. 4 :- परभणी जिल्ह्यातील फायरिंग बटचे बांधकाम चालु असल्याने त्याठिकाणी गोळीबार
सराव घेण्यात येवु शकत नसल्यामुळे परभणी जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचारी यांचे गोळीबार
सराव दिनांक 05 नोव्हेंबर, 2016 ते 15 नोव्हेंबर, 2016 पर्यंत या कालावधीत घेण्याचे नियोजित केलेले आहे.
तरी गोळीबार सरावासाठीचे मौजे वगरवाडी ता. औंढा स. न. 25 व 29 मधील गोळीबार
मैदान ( फायर बट ) उपलब्ध करुन मिळण्याची मागणी आलेली आहे. महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम
1966 चे कलम 22 अन्वये व मुंबई पोलीस अधिनियम 1951 मधील कलम 33(1) (ख) व (प) नुसार
मौजे वगरवाडी ता. औंढा ना. जि. हिंगोली येथील फायरींग रेंज मैदानवरील कालावधीसाठी उपलब्ध
करुन देण्यात येत आहे, असे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी अनिल माचेवाड यांनी कळविले आहे.
सदर ठिकाण धोकादायक क्षेत्र म्हणुन घोषित करीत आहे, सदरील परिसरात गुरांना
न सोडणे व कोणत्याही व्यक्तीने त्या क्षेत्रात प्रवेश करु नये, अशा सुचना पोलीस अधिकारी
यांनी दवंडीव्दारे व ध्वनीक्षेपकाव्दारे संबंधीत गावी सर्व संबंधितांना देण्यात याव्यात,
व तहसिलदार औंढा ना. व पोलीस स्टेशन हटृा यांना मौजे वगरवाडी फायरींग बट व परिसरात
दवंडीव्दारे व ध्वनीक्षेपकाव्दारे सदरील आदेशाची प्रसिध्दी करावी, असे प्रसिध्दी पत्रकात
नमूद केलेले आहे.
*****
No comments:
Post a Comment