अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळ अंतर्गत
बीज भांडवल कर्ज योजनेसाठी लाभ घेण्याचे आवाहन
हिंगोली,
दि. 21 : महाराष्ट्र राज्यात ज्या
जाती जमातीसाठी स्वतंत्र महामंडळ अस्तित्वात
नाही अशा जाती जमातीच्या अर्थिक दृष्टया
दुर्बल घटकातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांकरिता अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास
महामंडळातर्फे बीज भडवल कर्ज योजना राबविली जाते यामध्ये बॅकेचा सहभग 60 टक्के असून
उमेदवारांचा सहभाग 05 टक्के व 35 टक्के रक्कम अण्णासाहेब आर्थिक विकास मंहमंडळाकडून
बीज भाडवल येाजनेसाठी देण्यात येते.
सदर 35 टक्के रक्कमेवर 4 टक्के व्याज आकारण्यात येते.
कर्ज परत फेडीचा कालावधी 5 वर्षाचा आहे. या योजनेचा फायदा अधिक तत्परतेने पारदर्शकपने
सहज उपलब्ध व्हावा याकरिता महामंडळातर्फे आता (www.mahaswayamrojgar.maharashtra.gov.in) या
संकेत स्थळाची निर्मिती करण्यात आली आहे. या संकेत स्थळावर उमेदवारांना रोजगारासाठी
कर्ज अर्ज ऑनलाईन भरणे, कर्ज योजनेसाठी आवश्यक पात्रता अटी व शर्ती, कर्ज मंजूर होण्यापूर्वी
तसेच कर्ज मंजूर झाल्यावर सादर करावयाची कागदपत्रे इत्यादीची माहिती, ऑन लाईन सादर केलेल्या अर्जाची सद्य:स्थिती तपासने, कर्ज
परतफेडीची सद्य:स्थिती पाहने व कर्ज फेडीच्या
हप्त्याची पररिगणना (EMI ) कॅलक्युलेटर करणे अशा सूविधा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या
आहेत. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादित अंतर्गत बीज भाडवल कर्ज
योजने अंतर्गत हिंगोली जिल्हयासाठी चालू वर्षा करिता 80 लाभार्थी प्राप्त करण्याचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहेत. यासाठी उपरोक्त संकेत
स्थळाचा वापर करुन लाभ घेऊन सुशिक्षीत बेरोजगारानी ऑन लाईन अर्ज सादर करावा. असे आवाहन सहायक संचालक, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता
मार्गदर्शन केंद्र, हिंगोली यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी भ्रमनध्वनी क्रमांक
9423576047 व 9823225556, तसेच दूरध्वणी क्र. 022-28342521/22/23/24/25 आणि
022-22657662 व 02456-224574 वर संपर्क साधावा.
*****
No comments:
Post a Comment