शिक्षक मतदार संघाच्या मतदार याद्यांचा पुर्नरिक्षण कार्यक्रम
·
प्रारुप मतदार यादीवर दावे व हरकती स्विकारणे
हिंगोली, दि. 24:- निवडणूक आयोगाने दिनांक 1 नोव्हेंबर, 2016 रोजीच्या अर्हता दिनांकावर आधारित शिक्षक मतदारसंघाची प्रारुप मतदार यादी दिनांक 23 नोव्हेंबर, 2016 रोजी प्रसिध्द करण्यात आली असून दिनांक 1 ऑक्टोबर, 2016 ते दिनांक 5 नोव्हेंबर, 2016 या कालावधीत तालुका निहाय नोंदणी झालेल्या शिक्षक मतदारांचा तपशिल खालील प्रमाणे आहे.
अ.क्र.
|
तालुक्याचे नाव
|
महसूल मंडळ निहाय भाग
|
प्रारुप मतदार यादीतील मतदार संख्या
|
||
पुरुष
|
स्त्री
|
एकूण
|
|||
1
|
हिंगोली
|
154 ते 160=07
|
525
|
108
|
633
|
2
|
कळमनुरी
|
161 ते 166=6
|
442
|
55
|
497
|
3
|
सेनगाव
|
167 ते 172=6
|
339
|
13
|
352
|
4
|
वसमत
|
173 ते 179=7
|
638
|
112
|
750
|
5
|
औंढा नागनाथ
|
180 ते 183=4
|
274
|
40
|
314
|
एकूण
|
154 ते
183=30
|
2218
|
328
|
2546
|
प्रसिध्द करण्यात आलेली प्रारुप मतदार यादी मा. विभागीय आयुक्त कार्यालय,औरंगाबाद , जिल्हा निवडणूक कार्यालय, हिंगोली , सर्व उपविभागीय कार्यालये व सर्व तहसील कार्यालये जिल्हा हिंगोली येथे अवलोकनास्तव ठेवण्यात आलेली आहेत. प्रसिध्द करण्यात आलेल्या प्रारुप यादीवर दिनांक 23 नोव्हेंबर, 2016 ते 8 डिसेंबर, 2016 या कालावधीत दावे व हरकती दाखल करता येणार आहेत. नागरिकांकडन प्राप्त होणारे दावे व हरकती संबंधित तहसील कार्यालय येथे स्विकारले जातील . दावे व हरकती दाखल करण्याकरिता लागणारे नमुने ( नमुना -19, नमुना-7 व नमुना -8 ) जिल्हा निवडणूक कार्यालय, हिंगोली व जिल्ह्यातील सर्व उपविभागीय कार्यालये तसेच जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालये येथे उपलब्ध आहेत.
जिल्ह्यातील शिक्षक मतदारसंघाच्या मतदारांनी या मतदार नोंदणी कार्यक्रमाची नोंद घेवून आपले दावे व हरकती विहीत वेळेत दाखल करण्याची कार्यवाही करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी श्री. अनिल भंडारी यांनी कळविले आहे.
*****
No comments:
Post a Comment