महात्मा
फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या प्रशिक्षण योजनेतंर्गत
अर्ज करण्याचे आवाहन
हिंगोली,
दि. 18 : अनुसूचित जाती व नवबौध्द समाजातील
सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना तांत्रिक कौशल्य प्राप्त करण्याकरिता महात्मा फुले
मागासवर्ग विकास महामंडळामार्फत विविध व्यवसायाचे शासनमान्य् संस्थेमार्फत मोफत प्रशिक्षण
देण्यात येते. उदा. संगणक (एमएस-सीआयटी), मोबाईल रिपेअरिंग, फोटोग्राफी, ब्युटीपार्लर,
इत्यादी व्यवसायाच्या प्रशिक्षणासाठी सन 2016-17 वर्षाकरिता महामंडळाकडून अर्ज मागविण्यात
येत आहेत. अर्जासोबत जातीचा दाखला उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड, शैक्षणिक प्रमाणपत्र,
शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड, इत्यादी कागदपत्रे विहित नमुन्यातील अर्जासोबत फोटोसह
जोडून महामंडळाचे जिल्हा कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, रिसाला,
हिंगोली येथे दि. 25 नोव्हेंबर, 2016 पर्यंत सादर करण्याचे आवाहन जिल्हा व्यवस्थापक
यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.
*****
No comments:
Post a Comment