05 November, 2016

हिंगोली-नांदेड मार्गावरील वाहतूकीत बदल
हिंगोली, दि. 4 :- सहाय्यक मंडळ इंजिनियर कार्यालय पुर्णा यांनी दि. 04 नोव्हेंबर, 2016 रोजीचे 22.00 वाजता ते दि. 05 नोव्हेंबर, 2016 चे 06.00 वाजता पावेतो रेल्वे गेट क्र. 144 at Km872/2-3 चे काम करावयाचे असल्याने हिंगोली-नांदेड मार्गावरील वाहतूक वळविण्यात येत असल्याचे जिल्हादंडाधिकारी अनिल भंडारी यांनी कळविले आहे.
मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे कलम 33(1)(ख) अन्वये दि. 04 नोव्हेंबर, 2016 रोजीचे 22.00 वा. ते दि. 05 नोव्हेंबर, 2016चे 6.00 वाजता पावेतो हिंगोली - नांदेड मार्गावरील वाहतुक ही खटकाळी बायपास ते अकोला बायपास येथुन वळवुन हिंगोली शहराकडे मार्ग वळविण्याबाबत व हिंगोली शहरातून नांदेडकडे जाणारी वाहतूक ही हिंगोली शहरातून वाशिम रोड ते अकोला बायपास रोडणे वळवुन खटकाळी बायपास कडुन वळवुन नांदेडकडे वळविण्यात येत आहे, असे प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

*****

No comments: