10 November, 2016

विशेषिकृत दत्तक संस्थेसाठी स्वयंसेवी संस्थांनी
प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
हिंगोली, दि.10: जिल्ह्यात विशेषिकृत दत्तक संस्था (SAA) सुरू करावयाचे असून जिल्ह्यात कार्यरत स्वयंसेवी संस्था यांनी त्यांचे परिपुर्ण प्रस्ताव जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, एस 7, दुसरा मजला, हिंगोली या ठिकाणी दि. 19 नोव्हेंबर, 2016 रोजीच्या सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत 4 प्रतीत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कैलास तिडके यांनी केले आहे.
विशेषिकृत दत्तक संस्था (SAA) सुरू करण्याकरिता संस्था ही नामांकित, आर्थिकदृष्ट्या सक्षम व वैद्यकिय सोईसुविधा असणारी असावी. संस्थेचे संचालक मंडळ प्रतिष्ठित व्यक्तीचे असावे तसेच संबंधित संस्थेला कुठल्याही प्रकारचे अनुदान शासनामार्फत दिले जाणार नाही.

***** 

No comments: