राष्ट्रीय पत्रकार दिन साजरा
हिंगोली, दि.16: पत्रकारितेतील वृत्तपत्र स्वातंत्र्याची जपणूक होऊन पत्रकारितेतील
उच्च मुल्यांचे संवर्धन व्हावे यासाठी 16 नाव्हेंबर, 1966 रोजी प्रेस कॉन्सिल ऑफ इंडियाची
स्थापना करण्यात आली. आणि यानिमित्त सन 1997 पासून 16 नोव्हेंबर हा दिवस प्रेस कॉन्सिल
ऑफ इंडियाचा स्थापना दिवस राष्ट्रीय पत्रकार दिनन म्हणुन देशभर साजरा करण्यात येतो.
यानिमित्त जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने आज राष्ट्रीय पत्रकार दिनाचे
आयोजन करण्यात आले होते.
सर्वप्रथम दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार
अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमास पत्रकार कल्याण देशमुख,
प्रकाश इंगोले, शांताबाई मोरे, मिलिंद वानखेडे, कन्हैया खंडेलवाल, एहसान खान, नजीर
अहमद यांच्यासह पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*****
No comments:
Post a Comment