जिल्हयात
कलम 37 (1) (3) चे आदेश लागू
हिंगोली, दि. 16 : जिल्हयात
मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) चे आदेश दिनांक 13
नोव्हेंबर, 2016 रोजीचे 06.00 वा. पासुन
ते दि. 27 नोव्हेंबर, 2016 रात्रीच्या 12 वाजेपर्यंत लागू करण्यात येत असल्याचे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी
अनिल माचेवाड यांनी कळविले आहे.
दि. 17 ऑक्टोबर, 2016 पासून मा. राज्य निवडणूक आयोगाने नगरपालिका निवडणूकीची
घोषणा करण्यात आली असून हिंगोली जिल्ह्यात तीन नगर पालिका अनुक्रमे हिंगोली शहर, कळमनुरी
व वसमत येथे दि. 27 नोव्हेंबर, 2016 रोजी मतदान होणार असून त्यापुर्वी दि. 14 नोव्हेंबर,
2016 रोजी गुरूनानक जयंती हा सण साजरा करण्यात येणार आहे. कोपर्डी प्रकरण व खामगाव
येथील कोकरे आश्रम शाळेतील विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार झाला असून या घटनेच्या निषेधार्थ
विविध संघटना राजकीय पक्ष हे निवेदने, मोर्चे, धरणे, आंदोलने होण्याची शक्यता नाकारता
येत नाही तसेच तलाठी ग्रामसेवक यांचे कामबंद व संप सुरू असून तसेच हिंगोली जिल्ह्यात
राज्यात घडत असलेल्या घटनांच्या अनुषंगाने व राजकीय वर्तुळातील प्रतिक्रीयेमुळे जिल्ह्यात
कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या दरम्यान
उदभवणारी परिस्थिती हाताळण्यासाठी व कायदा व सुव्यवस्था आबाधीत ठेवण्यासाठी संपूर्ण
हिंगोली जिल्हयात दि. 13 नोव्हेंबर, 2016 रोजीचे 6.00 वा.
पासुन ते 27 नोव्हेंबर, 2016 रोजीचे 24.00
वा. पावेतो मुंबई पोलिस कायदा 1951 कलम 37 (1) (3) चे आदेश निर्गमित करण्यात येत असल्याचे
प्रसिध्दी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
*****
No comments:
Post a Comment