राष्ट्रीय
नागरी उपजिविका अभियानअंतर्गत बचत गटाचा कार्यक्रम संपन्न
हिंगोली,दि.28: नगरपरिषद वसमतचे नगराध्यक्ष श्रीनिवास पोरजवार,
मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव, उपमुख्याधिकारी मुजीब खान, कार्यालयीन अधिक्षक शाळ
माळवटकर यांच्या मार्गदर्शनाखाली दिनदयाल उपाध्याय अंतोदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिविका
अभियानांतर्गत शहरात नव्याने स्थापन करण्यात आलेल्या महिला बचत गटांना विविध वार्डात
दि. 15, 17, 18 व 25 फेब्रुवारी, 2017 रोजी प्रशिक्षण देण्यात आले.
सदरील
सर्व प्रशिक्षणात राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानाबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात
आले. बचत गट संकल्पना, वस्तीस्तर संघ, शहरस्तर संघाची कर्तव्य व जबाबदाऱ्या, स्वयंरोजगार
उपांगाअंतर्गत विविध उद्योगांची निवड, कर्ज प्रकरण, बँक व्यवहार इत्यादी बाबत सविस्तर
मार्गदर्शन अभियानाच्या सहाय्यक प्रकल्प अधिकारी संघरत्न नरवाडे व समुदाय संघटक सौ.
निर्मला ताटेवार यांनी केले.
त्याचबरोबर
सदरील सर्व प्रशिक्षणात स्वच्छ महाराष्ट्र अभियानाबाबत नगर परिषद अभियंता सनोबर तसनीम,
एम. एम. बळवंते, अविनाश चव्हाण यांनी सखोल मार्गदर्शन केले. ज्यामध्ये वैयक्तिक स्वच्छता,
शौचालय बांधकामाचे तांत्रिक मार्गदर्शन, उघड्यावर शौच विधीस गेल्याने त्यांचा आरोग्यावर
होणारा अनिष्ट परिणाम सांगून स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत योजनेचा लाभ प्रत्येक
पात्र कुटूंबाने घेऊन शौचालय बांधकाम व त्याचा वापर करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात
आले. महिला बचत गटातील सदस्यांनी स्वत: शौचालय बांधून वार्डातील इतर महिलांनी शौचालय
बांधून वापर करण्याबाबत प्रोत्साहित करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या
प्रशिक्षण कार्यक्रमात सौ. रेखा म्यानेवारताई, एल.आय.सी. चे विकास अधिकारी श्री. शिरपुरकर,
श्री. पत्रे, कार्यालयीन अधिक्षक शाम माळवटकर, नगरपरिषद अभियंता सनोबर तसनीम, एम. एम.
बळवंते, सहाय्यक प्रकल्प अधिकारी संघरत्न नरवाडे, समुदाय संघटक सौ. निर्मला ताटेवार,
अजगर पटेल, रविकिरण वाघमारे, नदीम सौदागर, शेख वसीम, अविनाश गायकवाड, शेख मोबीन, शेख
खयुम, अलीमोद्दीन, शेख पाशा, नगरसेविका सौ. साधनाताई पुंडगे, नगरसेवक, मोईनोद्दीन संदलजी,
दिवाकर पुंडगे, नगरपरिषद, वसमतचे मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव, नगरसेवक सचिन दगडू,
नगरपरिषद अभियंता अविनाश चव्हाण, एम. एम. बळवंते यांचा सहभाग होता तसेच अनुसयामाता
महिला बचत गट, अन्नपूर्णा, ईश्वरी, भाग्यलक्ष्मी, अष्टविनायक, चिंतामणी, मार्कन्डे,
अण्णाभाऊ साठे महिला बचत गट, जयमाता, दामिनी, पुजा, करुणा, नगमा, नगीना, सुविद्या,
प्रज्ञा, तिरुपती महिला बचत गट, रत्नेश्वरी, मुस्कान, वैष्णवी, संध्या, मिर्झा, साईश्रध्दा
महिला बचत, श्रावणी, विघ्नहर्ता, दुर्गा, वज्रेश्वरी, श्रध्दा, दुर्गेश्वरी या महिला
बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या.
*****