माजी सैनिकांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे पेन्शन
मिळणार
हिंगोली, दि. 9 : जिल्ह्यातील माजी सेनिकांना लवकरच सातव्या वेतन आयोगाप्रमाणे
पेन्श्न लागु होणार आहे. त्यामुळे माजी सैनिक / माजी सैनिक विधवा यांनी सविस्तर माहिती
देण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे. माजी सैनिक
/ माजी सैनिक विधवा यांनी सैन्यसेवा नंबर, रँक, सेवा पुस्तकाप्रमाणे नाव, आधार नंबर,
पेंन्शनर किंवा नॉन पेंन्शनर, जन्मतारीख, सेवामुक्तीची तारीख, युनीटचे नाव, घराचा संपुर्ण पत्ता, ई-मेल
आयडी, मोबाईल नंबर, पेंन्शन मिळत असलेल्या बँकेचे नाव, अकाऊंट नंबर, बँकेचा आय.एफ.सी.
कोड व ओळखपत्र क्रमांक एका कागदावर लिहून या कार्यालयात प्रत्यक्ष किंवा पोस्टाने पाठविण्याचे
आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
*****
No comments:
Post a Comment