09 February, 2017

25 एप्रिल, 30 ऑगस्ट आणि 18 ऑक्टोबर, 2017
 या तीन स्थानिक सुट्टया जाहीर
हिंगोली, दि. 9 : परिक्रम्य संलेख अधिनियम, 1881 अंतर्गत राज्य शासनाच्या शासन निर्णयाव्दारे राजनैतिक सेवा विभागाच्या दिनांक 16 जानेवारी, 1958 च्या शासन निर्णयान्वये हिंगोली जिल्ह्यात सन 2017 या वर्षात तीन स्थानिक सुट्या जाहिर करण्यात येत आहेत. यामध्ये 1)  हिंगोली येथील हजरत सिरेहक शाहबाबा ऊर्दु तिथी रहेमत तुल्ला का संदल और ऊरुस ( मंगळवार, दि. 25 एप्रिल, 2017) , 2) जेष्ठ गौरी पुजन (महालक्ष्मी) (बुधवार, दि. 30 ऑगस्ट, 2017) व 3) नरक चतुर्दशी (बुधवार, दि. 18 ऑक्टोबर, 2017) आदि. अशा प्रकारे जिल्ह्यातील वरील तीन दिवस स्थानिक सुट्टया म्हणून जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी जाहीर केल्या आहेत.
उपरोक्त स्थानिक सुट्या (राज्य न्यायालयाच्या अधिकार कक्षेतील कार्यालय, केंद्रीय प्रशासनातील कार्यालये व बँकेच्या कक्षेतील कार्यालयांखेरीज) हिंगोली जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये, जिल्हा परिषदेच्या कक्षेतील कार्यालय, स्थानिक स्वराज्य संस्थेची कार्यालये, जिल्ह्यातील शासकीय कोषागारे महामंडळाची कार्यालये व इतर सर्व खाजगी शैक्षणिक संस्था यांना लागू राहतील, असे प्रशासनाच्या वतीने कळविण्यात येत आहे.

*****  

No comments: