02 February, 2017

विधानपरिषद शिक्षक मतदार संघ निवडणूकीच्या
 मतदान केंद्र परिसरात कलम 144 लागु
हिंगोली, दि. 2 :- विधान परिषदेच्या औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणुकीची मतदानाची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्‍याय वातावरणात पार पाडण्‍याच्या दृष्‍टीकोनातून तसेच निवडणूक कालावधीत कायदा व सुव्‍यवस्‍था अबाधीत राहावी यादृष्‍टीने शुक्रवार दि. 3 फेब्रुवारी, 2017 रोजी सकाळी 7.00 वाजेपासून ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान केंद्र परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्‍वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत, असे जिल्हादंडाधिकारी हिंगोली कार्यालयानी कळविले आहे. 
हिंगोली जिल्‍हयात शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी 82-तहसिल कार्यालय, हिंगोली, 83-जि. प. प्रशाला बासंबा ता. हिंगोली, 84-तहसिल कार्यालय, कळमनुरी, 85-जि. प. प्रशाला आखाडा बाळापूर, ता. कळमनुरी, 86-जि. प. प्रशाला डोंगरकडा, ता. कळमनुरी, 87-जि. प. प्रशाला सेनगांव, 88-जि. प. प्रशाला गोरेगांव ता. सेनगांव, 89-तहसिल कार्यालय, वसमत, 90-जि. प. प्रशाला, हट्टा ता. वसमत, 91-जि. प. प्रशाला कुरूंदा, ता. वसमत, 92-तहसिल कार्यालय औंढा ना., 93-जि. प. प्रशाला जवळा बाजार, ता. औंढा ना. अशी 12 मतदान केंद्र निश्चित करण्यात आली आहेत.
या मतदान केंद्र परिसरात शुक्रवार 3 फेब्रुवारी रोजी मतदान केंद्राच्या हद्दी पावेतो मतदान सुरु झाल्यापासून मतदान संपेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू राहील. या आदेशान्वये उपरोक्त नमुद ठिकाणी 100 मिटरच्या परीसरात व्यक्तीच्या समुहास मुक्त संचार प्रवेशावर निर्बंध घालण्यात येत आहे. सदरील आदेश निवडणूक निर्णय अधिकारी यांनी प्राधिकृत केलेले अधिकारी/कर्मचारी व मतदान केंद्राच्या परिसरातील मतदारास लागु होणार नाहीत. मतदान केंद्राच्या परिसरात 100 मिटरच्या आत खाजगी वाहन घेऊन जाण्यास निर्बंध घालण्यात येत आहेत. तसेच संबंधितास नोटीस बजावुन त्यांचे म्हणने ऐकुण घेण्यास पुरेसा अवधी नसल्याने आणिबाणीचे प्रसंगी फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 (2) अन्वये एकतर्फी आदेश निर्गमित करण्यात येत आहे. असे प्रसिध्दी पत्रकात नमूद केले आहे.

***** 

No comments: