अनुसूचित
जमातीच्या विद्यार्थ्यांना नामांकित शाळेत प्रवेश
हिंगोली,दि.21:
हिंगोली
जिल्ह्यातील नांमाकित निवासी शाळा प्रवेशासाठी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास
प्रकल्प, कळमनुरी जि. हिंगोली यांच्या कार्यक्षेत्रात असलेल्या दोन जिल्ह्यातील परभणी
व हिंगोली सर्व अनुसूचित जमातीच्या पालकांना इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी
शांळांमध्ये सन 2017-2018 या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिली वर्गांकरिता प्रवेश देण्यात
येत आहे. खालील प्रमाणे अटी व शर्तीची पुर्तता करणाऱ्यांना सदर शाळेत प्रवेश देण्यात
येणार आहेत.
याकरीता पालकांचे उत्पन्न प्रमाणपत्र
एक लाखापेक्षा कमी असावे, पालक शासकीय नौकरीत नसल्याचे प्रमाणपत्र, पालकांचे जातीचे
प्रमाणपत्र, जन्माचा दाखला / शाळा शिकत असल्याचा
दाखला, वैद्यकीय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
वरील सर्व बाबींची पुर्तता करणाऱ्या विद्यार्थ्यास
सदर निवासी शाळेत प्रवेश मिळणार आहे. वरील कागदपत्रं चुकीचे अढळून आल्यास पालकांवर
दंडात्मक कारवाई करण्यात येईल याची सर्व पालकांनी नोंद घ्यावी. तसेच कोणत्याही पालकांनी
किंवा शाळांनी परस्पर विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेशित करु नये. तसे केल्यास सदर विद्यार्थ्यांची
संपूर्ण जबाबदारी शाळेची राहील असे प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकस प्रकल्प
कळमनुरी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
*****
No comments:
Post a Comment