तालुका व जिल्हास्तरीय क्रीडा प्रबोधनी चाचण्यांचे आयोजन
हिंगोली,
दि. 16 :- शासनाने दि. 18 नोव्हेंबर, 1995
च्या शासन निर्णयान्वये राज्यामध्ये पुणे येथे क्रीडा विद्यापीठ व 14 ठिकाणी
क्रीडा प्रबोधिनी स्थापन करण्याचा निर्णय घेतला त्यानुसार पुणे येथील क्रीडा
संकुलात शिवछत्रपती क्रीडापीठ व राज्यामध्ये 11 ठिकाणी क्रीडा प्रबोधनी
सद्यस्थितीत कार्यरत आहेत. या 11 क्रीडा प्रबोधिनीमध्ये दरवर्षी 8 ते 14 वर्षे वयोगटातील मुला-मुलींची भारतातील
खेळ प्राधिकरणाने पुरस्कृत केलेल्या बॅटरी ऑफ स्टेट, (क्रीडा नैपुण्य चाचणी) व सरळ
प्रवेश भरती प्रक्रियेव्दारे निवड करून क्रीडा प्रबोधिनीमध्ये प्रवेश देण्यात
येतो.
सन
2016-17 साठी शिवछत्रपती क्रीडापीठातंर्गत विविध 11 क्रीडा प्रबोधिनीत बॅटरी ऑफ
टेस्टव्दारे व सरळ प्रवेश प्रक्रियेअंतर्गत प्रवेश देण्यास मान्यता मिळाली आहे.
बॅटरी
ऑफ टेस्टमध्ये 1) वजन 2) उंची, 3) 30 मीटर भरधाव धावणे, 4) 6x10 मीटर शटल रन, 5) उभी लांब उडी, 6) उभी उंच उडी, 7) मेडिसीन बॉल
थ्रो, 8) लवचिकता, 9) 800 मीटर धावणे या 9 चाचण्यांचे एकुण 27 गुणांपैकी 17 किंवा त्यापेक्षा
जास्त गुण प्राप्त करणाऱ्या मुला-मुलींना क्रीडा प्रबोधिनीमध्ये प्रवेश देण्यात येतो.
सन 2016-17 या
वर्षाकरिता आयोजित करावयाच्या क्रीडा नैपुण्य चाचण्यासाठी मुला-मुलींचे वयोगट पुढीलप्रमाणे
असणार आहे. 1) 14 वर्षे वयोगट - 1 जुलै, 2003 तदनंतरची असावी, 2) 13 वर्षे वयोगट -
1 जुलै, 2004 तदनंतरची असावी, 3) 12 वर्षे वयोगट - 1 जुलै, 2005 तदनंतरची असावी,
4) 11 वर्षे वयोगट - 1 जुलै, 2006 तदनंतरची असावी, 5) 10 वर्षे वयोगट - 1 जुलै,
2007 तदनंतरची असावी, 6) 9 वर्षे वयोगट - 1 जुलै, 2008 तदनंतरची असावी, 7) 8 वर्षे
वयोगट - 1 जुलै, 2009 तदनंतरची असावी.
सन 2016-17 या
वर्षाकरिता नवीन प्रवेश देण्यासाठी 8 ते 14 वयोगटातील मुला-मुलींच्या क्रीडा नैपुण्य
चाचण्यांचे (बॅटरी ऑफ स्टेट) आयोजन करण्यासाठी पुढीलप्रमाणे कार्यक्रम प्रस्थापित करण्यात
येत आहे.
क्रीडा नैपुण्य
चाचण्या (बॅटरी ऑफ टेस्ट) आयोजनाचा कालबध्द कार्यक्रम सकाळी 10.00 वाजता खालील दर्शविलेल्या
दिनांक व ठिकाणी आयोजित करण्यात येईल.
अ.क्र.
|
कार्यक्रमाचे स्वरुप
|
क्रीडा नैपुण्य चाचण्या राबविण्याचा दिनांक
|
तालुका
|
आयोजनाचे ठिकाण
|
1
|
तालुकास्तरीय चाचण्यांचे आयोजन
|
22 ते 23 फेब्रुवारी, 2017
|
कळमनुरी
|
तालुका क्रीडा संकुल, कळमनुरी
|
23 ते 24 फेब्रुवारी, 2017
|
हिंगोली
|
जिल्हा क्रीडा संकुल, हिंगोली
|
||
22 ते 23 फेब्रुवारी, 2017
|
सेनगांव
|
तोष्णीवाल महाविद्यालय, सेनगांव
|
||
23 ते 24 फेब्रुवारी, 2017
|
औंढा (ना.)
|
शारीरिक शिक्षण महाविद्यालय, जवळा बाजार
|
||
23 ते 24 फेब्रुवारी, 2017
|
वसमत
|
बहिर्जी स्मारक विद्यालय, वसमत
|
||
2
|
जिल्हास्तरीय चाचण्यांचे आयोजन
|
25 ते 26 फेब्रुवारी, 2017
|
|
जय भवानी विद्यालय, उमरा ता. कळमनुरी जि.
हिंगोली
|
3
|
राज्यस्तर चाचण्यांचे आयोजन (अंतिम निवड
चाचणी) व वैद्यकिय चाचणी सदर तारखा इयत्ता 5 ते 9 वी शालांत परिक्षा कालावधी गृहित
धरुन ठरविण्यात आल्या आहेत.
|
06 ते 07 मार्च, 2017
|
|
शिवछत्रपती क्रीडापीठ, म्हाळुंगे, बालेवाडी,
पुणे
|
वरील दिलेल्या तारखानिहाय शाळास्तरावर क्रीडा नैपुण्य चाचण्याचे
काटेकोर व पारदर्शक पध्दतीने आयोजन करून एकुण 9 चाचण्यांमध्ये 17 किंवा त्यापेक्षा
जास्त गुण प्राप्त करणारे खेळाडूंची अंतिम मूळ यादी व सविस्तर अहवालाची मूळ प्रत उपरोक्त
तालुकास्तर चाचणीच्या वेळी खेळाडूसोबत घेऊन यावी जिल्हास्तर चाचणीच्या वेळी तालुका
क्रीडा संयोजक यांनी तालुकास्तरावरील पात्र खेळाडूंची यादी व अहवाल या कार्यालयात किंवा
जिल्हास्तर चाचणीच्या वेळी म्हणजेच दि. 25 फेब्रुवारी, 2017 पर्यंत या कार्यालायास
सादर करावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये
केले आहे.
*****
No comments:
Post a Comment