02 February, 2017

शिक्षक मतदारसंघ निवडणूक 3 फेब्रुवारी रोजी
·         मतदारांना मतदान करण्यासाठी ओळखपत्र अनिवार्य
हिंगोली, दि. 1 :- 5- औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी शुक्रवार, दि. 03 फेब्रुवारी 2017 रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 यावेळेत मतदान होणार आहे. भारत निवडणूक आयोगान मतदाराच्या ओळखीची खात्री पटण्यासाठी फोटो ओळखपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. शिक्षक मतदारा संघाचे जे मतदार मतदानाचे वेळी ओळखीचा पुरावा म्हणून छायाचित्र मतदार ओळखपत्र (EPIC) सादर करू शकणार नाहीत त्यांनी मतदानाचे वेळी पुढील पैकी एक पुरावा सादर करणे बंधनकारक केले आहे. 1) पारपत्र (Passport), 2) वाहन चालक परवाना (Driving License), 3) पॅन कार्ड, 4) ज्यावर फोटो आहे असे पदवी/ पदविका प्रमाणपत्र, 5) केंद्र शासकीय/ राज्य शासकीय प्राधिकारी यांनी निर्गमित केलेले छायाचित्र ओळखपत्र, 6) फोटो असलेले बँक पासबुक, 7) फोटो असलेले पी.आर. कार्ड, 8) फोटो असलेले रेशन कार्ड, 9) सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेले व फोटो असलेले जात प्रमाणपत्र, 10) फोटो असलेला शस्त्र परवाना, 11) फोटो असलेले दिव्यांगत्वाचे नोंदणी प्रमाणपत्र, 12) आधार कार्ड व 13) जनगणना प्राधिकारी यांनी निर्गमित केलेले फोटो ओळखपत्र.
सदर निवडणुकीसाठी जिल्ह्यात एकुण 12 मतदान केंद्र निश्चित करण्यात आलेले आहेत. सदर मतदान केंद्रासाठी पुरेशा प्रमाणात क्षेत्रिय अधिकारी, सुक्ष्म निरिक्षक, मतदान केंद्र अध्यक्ष, मतदान केंद्र अधिकारी यांच्या नियुक्त करण्यात आल्या आहेत. मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी/कर्मचारी यांचे पहिले प्रशिक्षण दिनांक :- 27 जानेवारी, 2017 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात घेण्यात आले आहे. क्षेत्रिय अधिकारी, सुक्ष्म निरीक्षक, मतदान केंद्राध्यक्ष, मतदान केंद्र अधिकारी यांनी करावयाच्या कामाची विस्तृत माहिती देऊन मतदानाचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. मतदान कामी नियुक्त केलेल्या अधिकारी/ कर्मचारी यांचे दुसरे प्रशिक्षण दिनांक: 02 फेब्रवारी, 2017 रोजी घेण्यात येणार आहे.
या निवडणुकीसाठी मतदारांनी पसंतीक्रम पध्दतीने मतदान करावयाचे असुन मतपत्रिकेवर जितक्या उमेदवारांची नावे आहेत तितक्या उमेदवारांना मराठी, इंग्रजी, हिंदी, रोमन किंवा भारतीय राज्य घटनातील (इंग्रजी प्रत) आठव्या अनुसुचीमध्ये दिलेल्या कोणत्याही एका भाषेतील अंकात पसंतीक्रम लिहण्यास मुभा आहे. पसंती क्रम शब्दात लिहिता येणार नाहीत. मतदारास मतपत्रिकेवर मतदान केंद्रावर उपलबध केलेल्या जांभळया शाईच्या स्केच पेननेच पसंती क्रमांक लिहावयाचे आहेत. मतपत्रिकेवर एकापेक्षा अधिक उमेदवाराचे नावासमोरील रकान्यात एकसारखा पसंती क्रमांक देता येत नाहीत. मतदारास त्यांचे पसंतीनुसार निवडणुकीस उभ्या असलेल्या सर्व उमेदवारांना त्यांचे संख्ये इतके पसंती क्रमांक देता येतील. मतपत्रिका वैध होण्यासाठी मतपत्रिकेवर कोणत्यातरी एका उमेदवारच्या नावा समोर पहिला (1) पसंती क्रम देणे बंधनकारक आहे. सदर निवडणूकीसाठी मा. भारत निवडणूक आयोगाने सदर निवडणूकीच्या मतपत्रिकेवर मतदारांसाठी NOTA हा ही पर्याय उपलब्ध करून दिला आहे. शिक्षक मतदारसंघाच्या मतदारांना मतदानाचा हक्क बजवाण्यासाठी मतदानाचे दिवशी संबंधीत प्रधिकरणाकडून विशेष नैमित्तीक रजा मंजूर करण्यात येणार आहे. सदर रजा ही कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय असलेल्या नैमित्तिक रेजे व्यतिरिक्त राहील.
त्वामुळे किंवा इतर शारिरीक कमजोरीमुळे एखादा दुसऱ्याचे सहाय्य घेतल्याशिवाय मतपत्रिकेवर मत नोंदवु शकत नाही आसे मतदाराने पुराव्यासह सिध्द केल्यास, अशा वेळी मत नोंदविण्यासाठी तसेच ते मत गुपीत राहिल यासाठी 18  वर्षाहुन कमी नाही इतक्या वयाची  व्यक्ति प्रतिज्ञा पत्रावर मदतनीस म्हणुन मतदान कक्षात स्वत: बरोबर नेण्याची परवानगी संबंधीत मतदान केंद्राध्यक्ष यांचेकडून देण्यात येईल.
हिंगोली जिल्ह्यातील औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुक साठीच्या सर्व मतदान केंद्रावर मतदानाचे पुर्णवेळ व्हिडीओ चित्रीकरण करण्यात येणार असून बोगस मतदान करणाऱ्या व्यक्तीवर कठोर कार्यवाही करण्यात येईल.

*****

No comments: