जलयुक्त शिवार अभियानातील कामे तात्काळ पूर्ण करावीत
--- जिल्हाधिकारी अनिल भंडारी
हिंगोली,दि.28:- गाव आरखडे तयार करुन
देण्यात यावेत. तसेच कार्यालय प्रमुखांनी शिवार फेरीचे दोन दिवसात कार्यक्रम
घेण्यात यावेत. तसेच जलयुक्त शिवार अभियानातील कामे तात्काळ पूर्ण करावीत, असे
जिल्हाधिकारी श्री. अनिल भंडारी यांनी निर्देश दिले.
सर्वांसाठी पाणी टंचाई
मुक्त महाराष्ट्र -2019 जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत सन 2015-2016 व 2016-2017
मधील गावाबाबत व तसेच 2017-2018 च्या नियोजबाबत आढावा बैठक जिल्हाधिकारी
कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी श्री. अनिल भंडारी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न
झाली. यावेळी कळमनुरी सहाय्यक जिल्हाधिकारी अमोल येडगे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी
अधिकारी ए. एन. देशमुख, उपजिल्हाधिकारी (रोहयो) के. ए. तडवी, वसमत उपविभागीय
अधिकारी मनोहर गव्हाड, जिल्हा वन अधिकारी केशव वाबळे, कार्यकारी अभियंता
(ग्रा.पा.पु) एस.आर. भागानगरे, भुजल सर्वेखण विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक
सी. डी. चव्हाण, कृषि विज्ञान केंद्रांचे प्रमुख डॉ. पी.पी. शेळके, उगम
ग्रा.वि.सं. अध्यक्ष जयाजी पाईकराव, जिल्ह्यातील सर्व तालुका कृषि अधिकारी , अशासकीय संस्थेचे
प्रतिनिधी आदि विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थिती होती.
****
No comments:
Post a Comment