हिंगोली
जिल्ह्यात औरंगाबाद शिक्षक मतदार
संघासाठी
93.69 टक्के मतदान
हिंगोली, दि.3: विधान परिषदेच्या औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज पार पडलेल्या निवडणुकीत
जिल्ह्यातील 12 मतदान केंद्रांवर शिक्षक मतदारांनी मतदान केले. जिल्ह्यात 93.69
टक्के मतदान झाले असल्याची माहिती जिल्हा निवडणूक कार्यालयाने दिली.
जिल्हयात शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी
निश्चित करण्यात आलेल्या तहसिल कार्यालय, हिंगोली 91.83 टक्के, जि. प. प्रशाला
बासंबा ता. हिंगोली 89.44 टक्के, तहसिल कार्यालय, कळमनुरी 96.00 टक्के, जि. प.
प्रशाला आखाडा बाळापूर, ता. कळमनुरी 90.86 टक्के, जि. प. प्रशाला डोंगरकडा, ता.
कळमनुरी 87.10 टक्के, जि. प. प्रशाला सेनगांव 96.00 टक्के, जि. प. प्रशाला
गोरेगांव ता. सेनगांव 90.73 टक्के, तहसिल कार्यालय, वसमत 96.09 टक्के, जि. प.
प्रशाला, हट्टा ता. वसमत 96.30 टक्के, जि. प. प्रशाला कुरूंदा, ता. वसमत 97.24
टक्के, तहसिल कार्यालय औंढा ना. 94.39 टक्के आणि जि. प. प्रशाला जवळा बाजार, ता.
औंढा ना. 97.20 टक्के या 12 मतदान केंद्रावर एकूण 93.69 टक्के मतदान झाले.
शिक्षक मतदार संघाच्या निवडणुक कालावधीत कायदा
व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने आणि निवडणूक
यंत्रणेने पुर्वतयारी केली होती. या 12 मतदान केंद्र परिसरात चोख पोलीस बंदोबस्तही
ठेवण्यात आलेला होता. मतदानासाठी शिक्षक मतदारांच्या मतदान केंद्रांवर रांगा
लागलेल्या होत्या. जिल्ह्यातील 12 मतदान केंद्रांवर पुरुष मतदार 2 हजार 307 आणि स्त्री
मतदार 357 असे एकूण 2 हजार 664 या शिक्षक मतदारांपैकी 2 हजार 496 मतदारांनी आपला
मतदानाचा हक्क बजाविला. जिल्ह्यातील मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली असल्याची
माहिती निवडणूक विभागाने कळविली आहे.
****
No comments:
Post a Comment