कामगारांना मतदान करण्यासाठी एक
दिवसाची अथवा दोन तासाची सुट्टी
हिंगोली, दि. 13 :- जिल्ह्यात
दि. 16 फेब्रुवारी, 2017 रोजी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रीक
निवडणुका असल्यामुळे राज्य निवडणुक आयोग यांच्या दिनांक 18 जानेवारी, 2017 व
कामगार विभागाने दिनांक 2 फेब्रुवारी, 2017 रोजी काढलेल्या शासन परिपत्रकानुसार
जिल्हा कार्यक्षेत्रातील दुकाने आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृह, अन्नगृह , नाट्यगृहे,
व्यापार, औद्योगीक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती तंत्रज्ञान कंपन्या, शॉपींग
सेंटर, मॉल्स, रिटेलर्स इत्यादी आस्थापनामध्ये कार्यरत असलेल्या मतदाराना
मतदानाच्या दिवसी सुट्टी अथवा दोन तासाची
सवलत देण्यात यावी असे निवडणुक आयोग व कामगार विभाग यांचे आदेश आहेत.
तरी हिंगोली जिल्हयातील वरील
आस्थापनामध्ये काम करणाऱ्या सर्व कामगांराना मतदान करण्याकरिता दिनांक 16
फेब्रुवारी, 2017 रोजी एक दिवसाची भरपगारी सुट्टी देण्यात यावी. असे आवाहन सरकारी
कामगार अधिकारी टी. ई. कराड यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
*****
No comments:
Post a Comment