जिल्हा परिषद व पंचायत समिती
निवडणुकीसाठी
जिल्ह्यात 73.77 टक्के मतदान
हिंगोली, दि.17: जिल्हा
परिषद व पंचायत समिती निवडणुकीत जिल्ह्यात सरासरी 73.77 टक्के इतके मतदान झाले.
दि. 16 फेब्रुवारी, 2017 रोजी पार पडलेल्या मतदानाची अंतिम
आकडेवारी जिल्हा निवडणूक विभागाने दिली आहे. जिल्ह्यात 3 लाख 78 हजार 190 पुरुष मतदार
तर 3 लाख 37 हजार 555 स्त्री मतदार असे एकुण 7 लाख 15 हजार 745 मतदार आहेत. यापैकी
2 लाख 80 हजार 787 पुरुष मतदार आणि 2
लाख 47 हजार 191 स्त्री मतदार असे एकूण 5 लाख 27 हजार 978 मतदारांनी मतदानाचा हक्क
बजावला आहे. एकूण 73.77 टक्के मतदान झाले.
जिल्हा परिषद / पंचायत
समिती निवडणूकीची मतमोजणी गुरुवार दि. 23 फेब्रुवारी, 2017 रोजी संबंधीत
तालुक्यांच्या ठिकाणी होणार आहे.
*****
No comments:
Post a Comment