04 June, 2019

हंगाम 2017-18 मधील तूर व हरभरा आधारभूत किंमत खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी अर्जातील त्रुटींची पूर्तता करण्याचे आवाहन


हंगाम 2017-18 मधील तूर व हरभरा आधारभूत किंमत खरेदीसाठी
ऑनलाईन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी अर्जातील त्रुटींची पूर्तता करण्याचे आवाहन

हिंगोली, दि.4: केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत हंगाम 2017-18 हमी भावाने तूर व हरभरा खरेदी करण्यात आलेला होता. परंतू खरेदीसाठी ज्या शेतकऱ्यांचे ऑनलाईन नोंदणी झालेली आहे व एसएमएस मिळालेला नाही अशा शेतकऱ्यास शासनाने रु. 1 हजार प्रति क्विंटल (2 हेक्टर)  पर्यंत अनुदान वाटप चालू आहे. परंतू काही शेतकऱ्यांचे खाते आधार लिंक नसणे , खाते बंद असणे, आधार मॅपींग नसणे या कारणाने अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात  टाकण्यास  अडचणी येत आहेत. अशा  शेतकऱ्यांची यादी संबंधित खरेदी  केंद्रास पाठविण्यात आलेल्या आहेत. तरी यादी मधील  लाभधारक शेतकऱ्याने यादीमधील त्रुटींची पूर्तता करुन संबंधित सब एजन्ट किंवा जिल्हा मार्केटींग अधिकारी कार्यालय , परभणी येथे  सात दिवसात सादर करावे, असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी, परभणी / हिंगोली यांनी केले आहे.
00000

No comments: