राज्य ग्राहक कल्याण सल्लागार
समितीचे अध्यक्ष (मंत्रीस्तरीय)
तथा राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष
अरुण देशपांडे यांचा जिल्हा दौरा
हिंगोली, दि.27 : अन्न,
नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाअंतर्गत कार्यरत राज्य ग्राहक कल्याण
सल्लागार समितीचे अध्यक्ष (मंत्रीस्तरीय)
तथा राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष अरुण देशपांडे हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर
येत असून त्यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
सोमवार
दिनांक 1 जुलै 2019 रोजी सकाळी 10.30 वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन , सकाळी
10.30 ते दुपारी 12.30 वाजेदरम्यान (अन्न आयोगासंबंधी बैठक) जिल्हाधिकारी कार्यालय
येथे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्या समवेत शालेय पोषण आहार,
महिला व बाल विकास (आय सी डी एस) चे उप मुख्य कार्यकारी अधिकारी , प्रकल्प
अधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी तथा जिल्हा
तक्रार निवारण अधिकारी व श्री. अनभोरे
सचिव यांच्या समवेत बैठक व चर्चा, दुपारी 2.00 ते 5.00 वाजे दरम्यान
(ग्राहक कल्याण सल्लागार समितीसंबंधी बैठक) जिल्हाधिकारी कार्यालय येथे अध्यक्ष
यांचे समवेत जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सर्व अशासकीय/ शासकीय सदस्य, (वजन मापे, अन्न औषध प्रशासन, आरोग्य
विभाग, कृषी विभागाचे अधिकारी , जिल्हा परिषदेतील आरोग्य, स्वच्छता, शिक्षण व
बांधकाम विभागाचे सक्षम अधिकारी तसेच पोलिस, आरटीओ, एस.टी., टेलीफोन विभागाचे
अधिकारी आदी) जिल्हा पुरवठा अधिकारी व
राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे सदस्य संजय जोशी यांचे समवेत बैठक व चर्चा.
सायंकाळी
5.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे पत्रकार परिषद, सायंकाळी 7.00 वाजता शासकीय
विश्रामगृह येथे मुक्काम.
मंगळवार,
दिनांक 2 जुलै 2019 रोजी सकाळी 10.00 ते 5.00 वाजे दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय
येथे अध्यक्ष व सचिव यांचे समवेत अप्पर जिल्हाधिकारी तथा जिल्हा तक्रार निवारण
अधिकारी, जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी यांचे समवेत बैठक
व चर्चा . सायंकाळी 5.00 वाजता हिंगोली ग्राहक पंचायत आयोजित बैठकीस उपस्थिती,
सायंकाळी 7.00 वाजता शासकीय विश्रामगृह येथे मुक्काम.
बुधवार,
दिनांक 3 जुलै 2019 रोजी सकाळी 11.00 ते सायंकाळी 4.00 वाजेदरम्यान येथील ग्राहक
चळवळीतील कार्यकर्त्यांसोबत चर्चासत्र व बैठक, सायंकाळी 7.00 वाजता वाहनाने
मुंबईकडे प्रयाण .
00000
No comments:
Post a Comment