प्रलंबित
शिष्यवृत्ती अर्जाची माहिती 30 जून पर्यंत
सादर करण्याचे आवाहन
हिंगोली, दि.20 : जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक / प्राचार्य यांनी त्यांच्या महाविद्यालयाकडे सन 2011-12 ते
2016-17 या कालावधीत महा ई-स्कॉल प्रणालीवर नोंद झालेले परंतु आज पर्यंत प्रलंबित अर्ज
तसेच सन 2017-18 मध्ये ऑफलाईनद्वारे प्राप्त झालेले अर्ज परंतु आज पर्यंत प्रलंबित
शिष्यवृत्ती अर्जाची माहिती दिनांक
30 जून 2019 पर्यंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण व सामाजिक
न्याय विभागाकडे सादर करण्यात यावी. सदर मुदतीनंतर सन 2011-12 ते 2016-17 या कालावधीतील प्रलंबित अर्जाबाबत कोणताही विचार करण्यात येणार नाही.
विहीत मुदतीत माहिती सादर न केल्यास
विद्यार्थी शिष्यवृत्तीपासुन वंचित राहू नयेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण,
हिंगोली यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment