25 June, 2019

अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशास मुदतवाढ


अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशास मुदतवाढ

हिंगोली,दि. 25 : शैक्षणिक सत्र 2019-20 करिता प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रीया अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेस पालक आणि विद्यार्थ्यांच्या मागणीवरुन मुदत वाढ देऊन अनुक्रमे 26 जून व 28 जून करण्यात  आली आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थी  व पालकांनी आवश्यक कागदपत्रांसह प्रवेश अर्ज  भरुन अनुक्रमे 26 व 28 जून  रोजी संध्याकाळी 5.00 वाजेपर्यंत शासकीय तंत्रनिकेतन हिंगोली येथील अर्ज स्विकृती केंद्रावर खात्री करुन घ्यावी, असे आवाहन शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. आर. के. पाटील यांनी केले आहे.
00000

No comments: