17 June, 2019

क्षयरोग रुग्णांची माहिती निक्षय या संकेतस्थळावर नोंद करण्याचे आवाहन

क्षयरोग रुग्णांची माहिती निक्षय या संकेतस्थळावर नोंद करण्याचे आवाहन

           हिंगोली,दि.17:  क्षयरोग रुग्णांची माहिती निक्षय https://nikshay.in/ या संकेतस्थळावर नोंद करावी म्हणजे क्षयरुग्णांना व खाजगी व्यावसायिकांना वरील सगळ्या सुविधांचा लाभ घेता येईल. दिनांक 16 मार्च 2018 रोजीच्या भारत सरकारच्या राजपत्रातील अधिसूचनेनुसार क्षयरोग हा एक नोटीफायबल आजार असून त्याविषयी सर्व खाजगी दवाखाने, सर्व खाजगी वैद्यकीय व्यावसायिक, वैद्यकीय प्रयोगशाळा,सर्व औषध निर्माते, अशासकीय संस्थांमार्फत चालविली जाणारी रुग्णालये व दवाखाने, सर्व सार्वजनिक दवाखाने, रुग्णालये, वैद्यकीय अधिकारी यांनी  शासनास कळविणे बंधनकारक  असल्याचे घोषित केलेले आहे. सर्व सार्वजनिक तसेच खाजगी  रुग्णालये, वैद्यकीय व्यावसायिक  यांनी त्यांच्याकडे निदान झालेले / उपचार घेणाऱ्या क्षयरुग्णांची माहिती स्थानिक आरोग्य अधिककाऱ्यांना कळविणे बंधनकारक आहे. दिनांक 16 मार्च 2018 रोजीच्या क्षयरोग अधिसूचनेचे आदेश जारी करण्यात आलेले आहेत.
          क्षयरुग्णांची नोंद न केल्यास संबंधित सर्व सार्वजनिक व खाजगी रुग्णालयांना व वैद्यकीय व्यावसायिकांना भारतीय दंड संहिता 1860 च्या 45 कलम 269 आणि 270 च्या अंतर्गत शिक्षा होऊ शकते. औषध विक्रेत्यांसाठी आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालय, नवी दिल्ली  दिनांक 30 ऑगस्ट 2013 च्या परिपत्रकाप्रमाणे औषधे व प्रसाधने कायदा 1945 या मध्ये सुधारणा करुन  क्षयरोगावरील औषधांचे विक्रीसाठी विहित नमुन्यामध्ये क्षयरुग्णांची माहिती ठेवणे बंधनकारक आहे.
          तसेच क्षयरुग्णांना व इतर सर्वांना क्षयरोग व क्षयरोग संदर्भातील सोयी सुविधा यांची माहिती देण्यासाठी सुधारीत राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत क्षयरोग हेल्पलाईन सुरु करण्यात आला असुन त्याचा क्रमांक 1800116666 असा आहे, असे जिल्हा क्षयरोग अधिकारी, हिंगोली यांनी कळविले आहे.
00000

No comments: