17 June, 2019

दिनांक 20 जून पूर्वीच देयके कोषागारात सादर करण्याचे आवाहन




दिनांक 20 जून पूर्वीच देयके कोषागारात सादर करण्याचे आवाहन
                                                                                  
           हिंगोली,दि.17:  येथील कोषागार कार्यालय हे दिनांक 20 ते 25 जून 2019 या कालावधीत कोषागाराच्या नवीन इमारतीमध्ये स्थलांतरीत करावयाचे असून सदर वेळी आहरण व संवितरण अधिकारी यांचेकडील देयकांची स्विकृती व देयके पारीत करण्याकामीची संगणकीय चाचणी घेतल्यानंतरच कोषागाराचे कामकाज कार्यान्वित करण्यात येणार असल्याने उक्त नमूद कालावधीत देयके स्विकृती व देयके पारीत करणे इत्यादी कामकाज बंद राहणार आहे. सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी विविध प्रकारची देयके दिनांक 20 जून पूर्वीच कोषागारात सादर करण्याचे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.
000000


No comments: