राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कारासाठीची माहिती
24 जून पर्यंत सादर करण्याचे आवाहन
हिंगोली, दि.20 : जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक / प्राचार्य यांनी समाज
कल्याण विभागामार्फत दरवर्षी दि. 26 जुन रोजी राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म दिवस
सामाजिक न्याय दिन म्हणुन साजरा केला जातो. या दिवशी इयत्ता 10 वी आणि 12 वी च्या परीक्षेत शाळेमधुन किंवा कनिष्ठ महाविद्यालयामधुन
प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या अनुसुचित जाती, विमुक्त जाती भटक्या जमाती किंवा
विशेष मागास प्रवर्गातील (SC, VJNT, SBC प्रवर्ग) विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार या योजनेअंतर्गत प्रमाणपत्र, स्मृती चिन्ह व पाच हजार रुपये
प्रोत्साहनपर पुरस्कार दिला जातो.
या पुरस्कारासाठी पात्र विद्यार्थ्यांच्या
प्रस्तावासोबत -मुख्याध्यापक / प्राचार्य यांचे पत्र,विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेची
छायांकित प्रत,विद्यार्थ्यांच्या जातीच्या दाखल्याची छायांकित प्रत,शाळा सोडल्याचा
दाखल्याची छायांकित प्रत. (टी.सी.),विद्यार्थ्यांचे नावाचे आधारलिंक, बँक पासबुकची
छायांकित प्रत,पात्र विद्यार्थ्यांचे नाव रेखांकित करुन इयत्ता 10 वी किंवा 12 वी च्या
बोर्डाचा विद्यालय किंवा कनिष्ठ महाविद्यालयाच्या संपुर्ण निकालाची छायांकित प्रत इत्यादी
कागदपत्रे आवश्यक आहेत.
तरी जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक
/ प्राचार्य यांनी उपरोक्त योजनेसाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांचे प्रस्ताव वरील
आवश्यक कागदपत्रांसह सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण,हिंगेाली या कार्यालयात सोमवार दिनांक 24 जून 2019 रोजी दुपारी 4.00 पर्यंत सादर
करावेत, पात्र विद्यार्थी या लाभापासून वंचित
राहू नयेत, असे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण,हिंगेाली यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment