पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास
बाबत प्रशिक्षणासाठी नोंदणी करण्याचे आवाहन
हिंगोली,
दि.13 : ग्रामीण भागातील बहुतांश माजी सैनिक हे शेतकरी
कुटुंबातील असल्यामुळे पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय हा मूळ अथवा जोडधंदा म्हणून
त्यांच्या स्वयंरोजगारासाठी उत्तम पर्याय आहे. त्या अनुषंगाने ग्रामीण भागातील
माजी सैनिकांकरिता पशुंसंवर्धन, शेळीपालन, मत्स्यपालन, दुग्धव्यवसाय इत्यादीबाबतचे प्रशिक्षण आयोजित करण्याबाबतचा
प्रस्ताव संबंधित विभागाकडे प्रस्तावित आहे.
तरी इच्छुक माजी सैनिकांनी दिनांक 18
जून 2019 पर्यंत सदर प्रशिक्षणाकरिता जिल्हा सैनिक कल्याण कक्ष, हिंगोली येथे नोंद
करावी , असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ,
हिंगोली यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment