07 June, 2019

जिल्हा सरकारी वकील व सरकारी अभियोक्ता तसेच सहायक सरकारी वकील व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता यांच्या नव्याने नियुक्तीसाठी पात्र अर्जदारांची दिनांक 12 व 13 जून 2019 रोजी मुलाखत


जिल्हा सरकारी वकील  व सरकारी अभियोक्ता तसेच सहायक सरकारी वकील व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता यांच्या नव्याने नियुक्तीसाठी पात्र अर्जदारांची दिनांक 12 व 13 जून 2019 रोजी मुलाखत

हिंगोली, दि.7: परभणी जिल्हा व सत्र न्यायालयात जिल्हा सरकारी वकील व सरकारी अभियोक्ता तसेच सहायक सरकारी वकील व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता यांच्या नव्याने नियुक्तीसाठी नामिका पाठविण्यासाठी (पॅनल) तयार करण्यासाठी पात्र अर्जदारांकडून अर्ज मागविण्यात आले होते. एकूण 164 अर्ज प्राप्त झालेले आहेत. या उमेदवारांची मुलाखत दिनांक 12 व 13 जून 2019 या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी येथे आयोजित करण्यात आली आहे. त्याबाबतचे मुलाखतपत्र या कार्यालयाद्वारे  निर्गमित करण्यात आले आहेत.
तसेच उमेदवारांना मुलाखतीसाठी नेमून दिलेल्या दिनांक व वेळेच्या तपशिलाची उमेदवारांची यादी  www.parbhani.nic.in  या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांना मुलाखत पत्र प्राप्त झाले नसेल त्यांनी सदर यादीसह दिनांक 10 जून 2019 रोजी पर्यंत मुलाखत पत्र प्राप्त करुन घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात संपर्क साधावा, असे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी, परभणी यांनी एका प्रसध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
000000

No comments: