वसमत तालुक्यातील मौजे
हट्टायेथील विहिरीतून येणाऱ्या पांढऱ्या धुरामुळे
नागरीकांनी भयभीत न
होण्याचे प्रशासनाचे आवाहन.
हिंगोली, दि.24 : वसमत तालुक्यातील हट्टा येथील
जामा मस्जिद जवळील विहिरीतून दि.२३ जून २०१९ रोजी दुपार पासून पांढरा धूर येत
असल्याची माहिती नागरिकांनी तहसील प्रशासनास दिली असता. प्रशासना मार्फत महसूल
विभागातील अधिकारी/ कर्मचारी, भू-जल सर्वेक्षण विभागातील भूवैज्ञानिक यांनी गावात
जाऊन माहिती घेतली. भूवैज्ञानिक यांनी घेतलेल्या माहितीनुसार हट्टा गावातील जामा
मस्जिद जवळील विहिरीतून धूर येत असल्याचे दिसून आले. याशिवाय गावातील इतर
कोणत्याही विहिरीतून असा धूर येत नसल्याची माहिती मिळाली. सदर धूर कोणत्या
कारणामुळे येत आहे याबाबत प्रशासन माहिती घेत असून सद्य:स्थितीत नागरिकांनी भयभीत
होण्याचे काही कारण नसल्याचे यावेळी सांगण्यात आले. सदर विहिरीवर प्रशासनाचीन जर
असून आज दि. २४ जून रोजी घेतलेल्या माहिती नुसार सदर विहिरीत असलेला पांढरा धूर
नष्ट झाल्याचे दिसून आले. त्यामुळे नागरिकांनी भयभीत न होता कोणत्याही अफवेवर
विश्वास ठेऊ नये असे प्रशासनामार्फत आवाहन करण्यात आले आहे.
000000
No comments:
Post a Comment