30 April, 2022

 

शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज नोंदविण्याचे आवाहन

31 मे पर्यंत अर्ज नोंदणी करावी

 

हिंगोली, (जिमाका) दि. 30 :  शिष्यवृत्तीस पात्र विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज नोंदविण्यासाठी आगामी  31 मे पर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत अर्ज सादर करण्याचे आवाहन  शिवानंद मिनगीरे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण,‍हिंगोली यांनी  केले आहे.

सन 2021-2022 या शैक्षणिक वर्षात जिल्ह्यातील महाविद्यालयांत प्रवेशित अनुसूचित जाती, इमाव, विजाभज तसेच विमाप्र प्रवर्गातील प्रवेशित व भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनांसाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांचे महाडिबीटी प्रणालीवर ऑनलाइन अर्ज नोंदणी करण्यासाठी 14 डिसेंबर 2021 पासून ऑनलाइन प्रणाली सुरु आहे. सर्व प्रवेशित व शिष्यवृत्तीस पात्र अनु.जाती, विजाभज, इमाव तसेच विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज महाडिबीटी प्रणालीवर नोंदविण्यासाठी 31 मे 2022 ही अंतिम मुदत असल्याने शिष्यवृत्तीस पात्र सर्व विद्यार्थ्यांनी तात्काळ अर्ज नोंदणी करावी. तसेच महाविद्यालय स्तरावरील अर्जांपैकी पात्र असलेले अर्ज येत्या 31 मे पर्यंत मंजूर करण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली यांनी केले आहे.

सन 2021-22 या  वर्षामधील एकूण 929 अर्ज आज रोजी  महाविद्यालय स्तरावर प्रलंबित दिसून येत आहेत.  दरम्यान अनुसूचित जाती, विजाभज, इमाव तसेच विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज महाडिबीटी प्रणालीवर नोंदविण्यासाठी 28 फेब्रुवारी पर्यंत मुदत दिली होती. अर्ज भरण्यास अडचणी  येत होत्या, त्यामुळे अनु.जाती ला 7 मार्च तर विजाभज, इमाव व विमाप्र यांना अर्ज भरण्यासाठी 31 मार्च त्यानंतर वाढ करुन 30 एप्रिल देण्यात आली  होती. आता पुन्हा एकदा अर्ज भरण्याची  मुदत वाढवण्यात येऊन  ती  31 मे, 2022 पर्यंत केली आहे.

हिंगोली जिल्ह्यात सर्वात जास्त शिष्यवृत्ती अर्ज प्रलंबित असलेली दहा महाविद्यालये

हिंगोली जिल्ह्यातील स्व.दत्तराव हैबतराव थोरात नर्सिंग स्कुल, (हिंगोली)-68, एल.डी.एच.टी.स्कूल ऑफ नर्सिंग (हिंगोली)-51, यशवंत इन्स्टिटयुट ऑफ नर्सिंग स्कूल (हिंगोली)-33, महात्मा फुले विद्यालय (कळमनुरी)-25 , इंदिरा गांधी नर्सिंग स्कूल (वसमत)-24, जयहिंद नर्सिंग स्कूल (हिंगोली)-21, श्री.धनेश्वरी मानव विकास मंडळ  संचालित एस.व्ही.पी.कॉलेज ऑफ फार्मसी (हिंगोली)-21, व्ही.बी.एन.नर्सिंग स्कूल (हिंगोली)-19, स्व.एस.डी.मस्के स्कूल ऑफ नर्सिंग (हिंगोली)-15 , अमृतराव पाटीत ज्यु.कॉलेज माळहिवरा (हिंगोली)-14 या दहा महाविद्यालयातील सर्वात जास्त शिष्यवृत्ती अर्ज प्रलंबित आहेत.

****

29 April, 2022

 

पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड सुधारित हिंगोली जिल्हा दौरा

 

हिंगोली, (जिमाका) दि. 29 : राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री तथा हिंगोली जिल्ह्याच्या पालकमंत्री प्रा.वर्षाताई गायकवाड या दि. 30 एप्रिल व 01 मे, 2022 या दोन दिवसाच्या हिंगोली जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा सुधारित दौरा कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

  शनिवार, दि. 30 एप्रिल, 2022 रोजी सायंकाळी 8.45 वाजता विष्णू जिनिंग मैदान वसमत रोड परभणी येथून मोटारीने वसमतकडे प्रयाण. रात्री 9.20 ते 9.50 वाजता वसमत येथील जिल्हा परिषद मैदानात आयोजित गौतम बुध्द-महात्मा फुले-भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर  यांच्या 131 व्या जयंती उत्सवानिमित्त भव्य भीम गितांच्या कार्यक्रमास उपस्थिती. रात्री 9.50 वाजता जिल्हा परिषद मैदान, वसमत येथून मोटारीने शासकीय विश्रामगृह, हिंगोलीकडे प्रयाण. रात्री 10.30 वाजता शासकीय विश्रामगृह, हिंगोली येथे आगमन व मुक्काम .

रविवार, दि. 01 मे, 2022 रोजी सकाळी 8.00 ते 8.45 वाजता संत नामदेव कवायत मैदान हिंगोली येथे ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थिती . 8.45 वाजता जिल्हा वार्षिक योजनेतून पोलीस विभागास दिलेल्या वाहनास हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करणे. 8.55 वाजता महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अन्वये अधिसूचित लोकसेवांचे ऑनलाईन लोकार्पण कार्यक्रम. 9.25 वाजता संत नामदेव पोलीस कवायत मैदान येथून मोटारीने शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. 9.30 ते 10.00 वाजता शासकीय विश्रामगृह, हिंगोली येथे आगमन व राखीव. 10.00 वाजता शासकीय विश्रामगृह हिंगोली येथून मोटारीने जिल्हा परिषद हिंगोलीकडे प्रयाण. 10.10 वाजता जिल्हा परिषद स्थापनेस  दि. 1 मे, 2022 रोजी 60 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पुणे जिल्हा परिषदेअंतर्गत हिरक महोत्सव कार्यक्रम. 10.30 वाजता जिल्हा परिषद, हिंगोली येथून मोटारीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण. 10.35 ते 11.30 वाजता येथील जिल्हाधिकारी कार्यालयात खरीप हंगाम नियोजन, पाणी टंचाई आणि रोहयो इत्यादी विषयाबाबत आढावा बैठकीस उपस्थिती. 11.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली येथून मोटारीने शासकीय विश्रामगृह, हिंगोलीकडे प्रयाण. 11.30 ते दुपारी 1.00 वाजता शासकीय विश्रामगृह, हिंगोली येथे जनता दरबार कार्यक्रमास उपस्थिती. दु. 1.00 वाजता शासकीय विश्रामगृह, हिंगोली येथून मोटारीने जवळा बाजारकडे प्रयाण. दु. 1.30 वाजता जवळा बाजार ता.औंढा नागनाथ, जि. हिंगोली येथे बाहेती मेडिकल अँड जनरल स्टोअर्सचे उद्घाटन. दु. 2.00 वाजता जवळा बाजार येथून मोटारीने चिखलठाणा विमानतळ औरंगाबादकडे प्रयाण.  

****

 


रेशीम शेतीबाबत तांत्रिक प्रशिक्षण संपन्न

 

हिंगोली, दि. 29  (जिमाका) :  एसबीआय ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था हिंगोली आणि जिल्हा रेशीम कार्यालय, हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील इच्छुक शेतकऱ्यांचे रेशीम शेतीबाबत निवासी तांत्रिक प्रशिक्षण संपन्न झाले.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेतीपूरक जोडधंदा म्हणून रेशीम शेतीचा पर्याय स्वीकारावा यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरु आहेत. याचाच एक भाग म्हणून सन 2022-23 पासून रेशीम शेती करण्यास इच्छूक असलेल्या शेतकऱ्यांना हिंगोली येथील एसबीआय ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेत रेशीम शेतीचे संपूर्ण तांत्रिक प्रशिक्षण देण्यात आले.

जिल्ह्यातील 04 गावातील 13 शेतकऱ्यांना दि. 20 एप्रिल ते 29 एप्रिल, 2022 या कालावधीत‍ रेशीम शेतीविषयी निवासी तांत्रिक प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणाचाच भाग म्हणून प्रशिक्षणार्थींना प्रत्यक्ष स्थळ भेटीसाठी पांगरा शिंदे येथे दि. 25 एप्रिल, 2022 रोजी नेण्यात आले होते. तसेच दि. 29 एप्रिल, 2022 रोजी लेखी व मौखिक परीक्षा घेण्यात येऊन प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.

आज प्रशिक्षणाचा समारोप कार्यक्रम पार पडला. यावेळी जिल्हा रेशीम विकास अधिकारी स्वप्नील तायडे, संचालक धनाजी बोईले, परीक्षक सोनूने तसेच विजय खिल्लारे, संगीता मुळे, सर्व प्रशिक्षणार्थी यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन बोखारे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अशोक वडवळे, रमेश भवर, नितीन लोलगे, रजनीश कुटे, तानाजी परघणे, प्रितेश रटनाळू यांनी परिश्रम घेतले.

*****

 

रमजान ईद निमित्त जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्याठी

विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांची नियुक्ती

 

हिंगोली, दि. 29  (जिमाका) :  जिल्ह्यात दि. 03 मे, 2022 या दिवशी रमजान ईद साजरी करण्यात येणार आहे. रमजान ईद निमित्त जिल्ह्यात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने बंदोबस्‍त लावण्यात येतो. या काळात शुल्लक कारणावरुन अशांतता निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अचानक निर्माण होते. अशा अचानक उद्भवलेल्या कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीस तोंड देण्यासाठी बंदोबस्तातील अधिकाऱ्यासोबत विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांची आवश्यकता आहे.

त्यामुळे संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात सर्व 13 पोलीस स्टेशनसाठी प्रत्येकी एक याप्रमाणे 13 विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांची नियुक्ती जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र पापळकर यानी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 अन्वये हिंगोली जिल्ह्यात दि. 03 मे, 2022 रोजी उद्भवणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न हाताळण्यासाठी नियुक्ती केली आहे.  

वसमत शहर व ग्रामीण पोलीस स्टेशनसाठी वसमतचे उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी डॉ.सचिन खल्लाळ यांची , हट्टा पोलीस स्टेशनसाठी वसमतचे तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी अरविंद बोळंगे, कुरुंदा पोलीस स्टेशनसाठी वसमतचे महसूल विभागाचे नायब तहसीलदार विलास तेलंग, हिंगोली शहर व ग्रामीण पोलीस स्टेशनसाठी उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी उमाकांत पारधी, नरसी नामदेव पोलीस स्टेशनसाठी हिंगोली तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी नवनाथ वगवाड, बासंबा पोलीस स्टेशनसाठी हिंगोली उपविभागीय कार्यालयातील नायब तहसीलदार प्रवीण ऋषी, कळमनुरी पोलीस स्टेशनसाठी कळमनुरीच्या तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी सुरेखा नांदे यांची, बाळापूर पोलीस स्टेशनसाठी कळमनुरी येथील महसूल विभागाचे नायब तहसीलदार पाठक यांची, औंढा नागनाथ पोलीस स्टेशनसाठी तहसील तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी डॉ.कृष्णा कानगुले यांची, सेनगाव पोलीस स्टेशनसाठी तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी जीवक कांबळे यांची, गोरेगाव पोलीस स्टेशनसाठी सेनगाव येथील महसूल विभागाचे नायब तहसीलदार सुनिल कावरखे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

वरील नियुक्ती केलेल्या दंडाधिकाऱ्यांनी त्यांच्या नावासमोर कार्यक्षेत्राच्या हद्दीत दि. 03 मे, 2022 रोजी विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. तसेच उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांनी नेमून दिलेल्या पोलीस स्टेशनशिवाय त्यांच्या उपविभागावर दंडाधिकारी म्हणून नियंत्रण ठेवावे. तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी यांनी त्यांना नेमून दिलेल्या पोलीस स्टेशनशिवाय त्यांच्या तालुक्यात कार्यकारी दंडाधिकारी म्हणून नियंत्रण ठेवावेत, असे आदेश दिले आहेत.

*****

 

कोविड-19 मुळे विधवा झालेल्या महिलांना मिशन वात्सल्य योजनेचा लाभ

 

हिंगोली, (जिमाका) दि. 29 : कोरोनामुळे घरातील कर्त्या पुरुषाचे निधन होऊन एकल, विधवा झालेल्या महिलांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळावा यासाठी शासनाने मिशन वात्सल्य योजना सुरु केली आहे. यासाठी जिल्ह्यात तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीच्या नियमित बैठका होत आहेत. कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत जवळपास 510 जणांना आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांना व कुटुंबातील कर्त्या पुरुषांचे निधन होऊन एकल, विधवा झालेल्या महिलांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.   

यामध्ये कुटुंब निवृत्ती योजना, शिधापत्रिका, वारस प्रमाणपत्र, बँक खाते, आधार कार्ड, जन्म मृत्यू दाखला, मालमत्ता विषयक हक्क, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, घरकुल योजना यासह इतर 24 योजनांचा समावेश आहे. जिल्ह्यातील कोविड-19 काळात एक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या 174 बालकांना बालसंगोपन योजनेचा लाभ देण्यात आला आहे. तसेच कोविड काळात दोन्ही पालक गमावलेल्या तीन बालकांना अनाथ प्रमाणपत्र देण्यात आले आहे. कोविड काळात आजपर्यंत जिल्ह्यात तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली 44 बैठका झाल्या आहेत. यामध्ये हिंगोली तालुका 08, कमळनुरी तालुका 10, सेनगाव तालुका 09, औंढा नागनाथ तालुका 08 आणि वसमत तालुक्यातील 09 बैठकांचा समावेश आहे.

मिशन वात्सल्य योजनेअंतर्गत कोविड-19 मुळे विधवा झालेल्या 251 महिलांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात आला. यामध्ये हिंगोली 351, कळमनुरी 415, सेनगाव 261, औंढा नागनाथ 277, वसमत 430 याप्रमाणे 1734 योजनांचा लाभ देण्याबाबतची कार्यवाही करण्यात आली असल्याचे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

****

28 April, 2022

 

पीयुसी चाचणी प्रमाणपत्राच्या दरामध्ये वाढ

 

हिंगोली, (जिमाका) दि. 28 : मोटार वाहनाच्या पीयुसी चाचणी प्रमाणपत्राच्या दरामध्ये महाराष्ट्र शासनाच्या 25 एप्रिल, 2022 निर्देशानुसार वाढ करण्यात आली आहे. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

दुचाकी वाहनासाठी 50 रुपये, पेट्रोलवरील तीन चाकी वाहनासाठी 100 रुपये, पेट्रोल, सीएनजी, एलपीजीवर चालणारे चार चाकी वाहनासाठी 125 रुपये, डिझेलवर चालणाऱ्या वाहनासाठी 150 रुपये याप्रमाणे सुधारित दर आहेत. याची सर्व वाहन धारकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन अनंता जोशी, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

****

 

अक्षय तृतीयेच्या दिवशी बालविवाह होणार नाही याची दक्षता घ्यावी

                                                         - जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

 

         हिंगोली (जिमाका) दि.28 : राज्यात अल्पवयीन बालकांच्या समस्या अधिक गुंतागुंतीच्या बनत आहेत. कोरोना कालावधीत इतर समस्यांसोबत बालविवाह ही  भेडसावणारी महत्वपूर्ण समस्या बनली आहे. सततचे लॉकडाऊन बंद, ऑनलाईन शाळा , बेरोजगारी यामुळे बाल विवाहाचे प्रमाण वाढत आहे. एप्रिल 2021 ते मार्च 2022 या  एक वर्षाच्या काळात राज्यात वेगवेगळ्या भागात एकूण 1 हजार 338 बाल विवाह रोखण्यात प्रशासनास यश आले आहे.

         अक्षय तृतीया हा महत्वाचा मुहूर्त 3 मे, 2022 रोजी असल्याने या शुभ मुहूर्तावर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विवाह आयोजित केले जातात. यावेळी बालविवाह सुध्दा मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता असते. बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006 संपूर्ण राज्यात लागू करण्यात आलेला आहे. बाल विवाहाला प्रोत्साहन देणाऱ्याला व बाल विवाहासाठी उपस्थित राहणाऱ्याला कलम 9, 10, 11 नुसार बाल विवाह प्रकरणात 01 लाख रुपयाचा दंड व दोन वर्षापर्यंतच्या कारावासाची शिक्षा आहे. बालविवाह आयोजित करणे अजामीन पात्र गुन्हा आहे.

         बाल विवाहाला प्रतिबंध करण्यासाठी व बाल विवाहाची प्रकरणे हाताळण्यासाठी महिला व बाल विकास विभाग, युनिसेफ आणि एसबीसी3 च्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील महत्वाचे अधिकारी, कर्मचारी यांना बाल विवाह निर्मूलन प्रशिक्षण देण्यात येत आहे. या प्रशिक्षणामध्ये आरोग्य विभागाचे आशा गट प्रवर्तक, एएनएम, एलएचव्ही, समुदाय आरोग्य अधिकारी शाळेचे मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, अंगणवाडी पर्यवेक्षिका अशा 373 अधिकारी व कर्मचारी यांना बाल विवाहाची प्रकरणे हाताळण्यासाठी तयार करण्यात आले आहे.

         अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आपल्या जिल्ह्यात बाल विवाह होणार नाहीत याबाबत योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना ग्रामसवेक, पोलीस, अंगणवाडी सेविका, बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत. जिल्हा महिला व बालविकास विभागामार्फत सर्व विवाह लावणाऱ्या मंडप डेकोरेशन मालक, पत्रिका छापणारे, फोटोग्राफर, धार्मिक स्थळ, लग्न विधी लावणारे सर्व भटजी, भंते, काजी, फादर यांना या बाबतीत सतर्क राहून लग्न सोहळ्याचे ऑर्डर घेण्याअगोदर मुलीचे, मुलाचे वयाचे दाखले तपासून घ्यावेत. त्याची प्रत सोबत ठेवावी. बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 नुसार मुलीचे वय 18 व मुलाचे वय 21 असावे, असे निर्देशित करण्यात आलेले आहे. मुलाचे व मुलीचे वय यापेक्षा कमी असेल तर असे विवाह बेकायदेशीर ठरले जातात. अशा गुन्ह्यास एक लाख रुपये दंड व दोन वर्षे सक्त मजुरीची शिक्षा होऊ शकते.

आपल्या विभागात बालविवाह होत असल्यास कृपया बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणजेच ग्रामीण भागात ग्रामसेवक आणि अंगणवाडी सेविका तसेच शहरी भागात बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) व अंगणवाडी पर्यवेक्षिका यांना माहिती द्यावी. तसेच चाईल्ड लाईन 1098, पोलीस हेल्पलाइन क्रमांक 112 वर माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर केले आहे.

******

 

पोस्ट ऑफिस करणार आता ‘ई-पेमेंट’ने व्यवहार

हिंगोली, (जिमाका) दि. 28 : टपाल विभागाने डिजिटल मार्ग स्वीकारण्यास सुरवात केली आहे. त्यातच आता डिजिटल पेमेंटची भर पडली आहे. विशेषतः ग्रामीण भागातील पोस्ट ऑफिस मध्ये देखील डिजिटल पेमेंट करता येणार आहे. परभणी विभागातील 37 पोस्ट ऑफिसमध्ये ही सेवा कार्यान्वित करण्यात आली आहे.

सध्या विविध शासकीय यंत्रणांनी ऑनलाईनचा स्वीकार केला असून बहुतांश शासकीय कामे, शुल्क भरणे एका क्लिकवर होते. त्यात आता टपाल खाते सुद्धा मागे राहिले नाही. त्यामुळे नागरिकांना आता पोस्ट ऑफिसमध्ये देखील रोख बाळगायची गरज भासणार नाही.

नागरिकांना मनी ऑर्डर, पार्सल बुकींग, स्पीड पोस्ट, रजिस्टर आदीचे शुल्क आता ‘क्यूआर कोड’ स्कॅन केल्यानंतर देता येणार असल्याचे परभणी विभागाचे डाकघर अधीक्षक मोहम्मद खदीर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

*****

 महाराष्ट्र दिनी सामाजिक न्याय विभागामार्फत विविध योजनांचा जागर

 

हिंगोली, (जिमाका) दि. 28 : राज्यातील गावागावात येत्या 1 मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या दिवशी सामाजिक न्याय विभागामार्फत सामाजिक न्यायाचा जागर करण्याची अभिनव संकल्पना अमलात आणली असून या संदर्भातील शासन निर्णय सामाजिक न्याय विभागामार्फत निर्गमित करण्यात आला आहे.

या शासन निर्णयानुसार दि. 1 मे , महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात झेंडा वंदनाच्या वेळी सामाजिक न्याय विभागाच्या सर्व योजनांची माहिती देणारी माहिती पत्रिका किंवा माहिती पुस्तिका यांचे वाटप करण्यात येणार आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी पालकमंत्री, ग्रामीण भागात लोक प्रतिनिधी किंवा प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्यामार्फत योजनांचे संक्षिप्त स्वरुपात वाचन करण्यात येणार आहे.

यावर्षी देशभरात अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. सामाजिक न्याय विभागाने राज्य निर्बंधमुक्त होताच सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या सकल्पनेतून राज्यभरात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 11 दिवस विविध उपक्रम आयोजित करुन साजरी करण्यात आली.

अनुसूचित जाती, नवबौध्द घटक यासह समाजातील आर्थिक दुर्बल व मागास घटकांसाठी सामाजिक न्याय विभागाच्या वैयक्तीक व सामुहिक लाभाच्या अनेक योजना कार्यरत आहेत. या योजनांची जनजागृती करुन तळागाळातील गरजूंना लाभ मिळवून देण्याचा उद्देश आहे.

महाराष्ट्र दिनाच्या दिवशी झेंडावंदन होणाऱ्या शासकीय आस्थापनाच्या ठिकाणी सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती देणारे स्टॉल्स, बॅनर्स लावणे तसेच माहिती पत्रिका वाटप करणे यासाठी विभागाने नियोजन केले आहे. या अभिनव उपक्रमाची अंमलबजावणी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, हिंगोली यांच्यामार्फत येत्या महाराष्ट्र दिनी करण्यात येणार आहे, असे आवाहन शिवानंद मिनगीरे, सहाय्यक आयुक्त , समाज कल्याण, हिंगोली यांनी केले आहे.  

****

27 April, 2022

 


पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड

दोन दिवसाच्या हिंगोली जिल्हा दौऱ्यावर

 

हिंगोली, (जिमाका) दि. 27 : राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री तथा हिंगोली जिल्ह्याच्या पालकमंत्री प्रा.वर्षाताई गायकवाड या दि. 30 एप्रिल व 01 मे, 2022 या दोन दिवसाच्या हिंगोली जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

  शनिवार, दि. 30 एप्रिल, 2022 रोजी सायंकाळी 7.30 वाजता विष्णू जिनिंग मैदान वसमत रोड परभणी येथून मोटारीने वसमतकडे प्रयाण. रात्री 8.10 वाजता वसमत येथील जिल्हा परिषद मैदानात आयोजित गौतम बुध्द-महात्मा फुले-भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर  यांच्या 131 व्या जयंती उत्सवानिमित्त भव्य भीम गितांच्या कार्यक्रमास उपस्थिती. रात्री 9.00 वाजता जिल्हा परिषद मैदान, वसमत येथून मोटारीने शासकीय विश्रामगृह, हिंगोलीकडे प्रयाण. रात्री 10.00 वाजता शासकीय विश्रामगृह, हिंगोली येथे आगमन व मुक्काम .

रविवार, दि. 01 मे, 2022 रोजी सकाळी 8.00 ते 8.45 वाजता संत नामदेव कवायत मैदान हिंगोली येथे ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थिती . 8.45 वाजता जिल्हा वार्षिक योजनेतून पोलीस विभागास दिलेल्या वाहनास हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करणे. 8.55 वाजता संत नामदेव पोलीस कवायत मैदान येथून मोटारीने शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. 9.00 ते 11.15 वाजता शासकीय विश्रामगृह, हिंगोली येथे आगमन व राखीव. 11.30 ते 01.00 वाजता येथील जिल्हाधिकारी कार्यालयात खरीप हंगाम नियोजन, पाणी टंचाई आणि रोहयो इत्यादी विषयाबाबत आढावा बैठकीस उपस्थिती. दुपारी 1.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली येथून मोटारीने शासकीय विश्रामगृह, हिंगोलीकडे प्रयाण. दुपारी 1.15 ते 3.00 वाजता शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे आगमन व राखीव. दुपारी 3.00 ते 4.30 वाजता शासकीय विश्रामगृह, हिंगोली येथे जनता दरबार कार्यक्रमास उपस्थिती. सांय. 4.30 वाजता शासकीय विश्रामगृह, हिंगोली येथून मोटारीने जवळा बाजारकडे प्रयाण. सांय. 5.00 वाजता जवळा बाजार ता.औंढा नागनाथ, जि. हिंगोली येथे बाहेती मेडिकल अँड जनरल स्टोअर्सचे उद्घाटन. सांय. 5.30 वाजता जवळा बाजार येथून मोटारीने शासकीय विश्रामगृह, परभणीकडे प्रयाण.  

****



 अक्षय तृतीयाच्या मुहुर्तावर एकही बालविवाह होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी

                                                         - जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

 

         हिंगोली (जिमाका) दि.27 : जिल्ह्यात अल्पवयीन बालकांच्या समस्या अधिक गुंतागुंतीच्या बनत आहेत. कोरोना कालावधीत इतर समस्यांसोबत बालविवाह ही  भेडसावणारी महत्वपूर्ण समस्या बनली आहे. सततचे लॉकडाऊन बंद, ऑनलाईन शाळा , बेरोजगारी यामुळे बाल विवाहाचे प्रमाण जिल्हाभरात वाढत आहे. एप्रिल 2021 ते मार्च 2022 या  एक वर्षाच्या काळात जिल्ह्यातील एकूण 1 हजार 338 बाल विवाह रोखण्यात प्रशासनास यश आले आहे.

         अक्षय तृतीया हा महत्वाचा मुहूर्त 3 मे, 2022 रोजी असल्याने या शुभ मुहूर्तावर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विवाह आयोजित केले जातात. यावेळी बालविवाह सुध्दा मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता असते. बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006 संपूर्ण राज्यात लागू करण्यात आलेला आहे. त्यानुसार बालविवाह आयोजित करणे अजामीन पात्र गुन्हा आहे. त्याचप्रमाणे अक्षय तृतीया या दिवशी महाराष्ट्र राज्यात देखील बालविवाह होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

         भारतीय संस्कृतीत विवाह ही समाजातील महत्वाची आणि सार्वत्रिक सामाजिक क्रिया आहे. अक्षय तृतीया या शुभ मुहूर्तावर सामुदायिक तसेच एकल विवाह समारंभ आयोजित केले जातात. यामध्ये बालविवाहाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर होणाऱ्या विवाहात बालविवाह रोखण्यासंदर्भात एक महत्वपूर्ण पाऊल उचलने अत्यंत गरजेचे आहे.

         बालविवाह ही प्रथा बाल हक्कांच्या विरोधी असून बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम,2006 नुसार असे विवाह बेकायदा ठरतात आणि या विरोधात गुन्हा नोंदविला जाणे अपेक्षित आहे .  अशा गुन्ह्यास  एक लाख रुपये दंड व दोन वर्षे सक्त मजुरीची शिक्षा आहे. या कायद्याच्या अंमलबजावणी करीता ग्रामीण भागासाठी ग्रामसेवक आणि शहरी भागासाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहेत. तसेच ग्रामस्तरावर ग्राम बाल संरक्षण समिती स्थापन करण्यात आली असून या समितीचे अध्यक्ष सरपंच आहेत व सदस्य सचिव अंगणवाडी सेविका आहेत. या सर्वानी आपापल्या कार्यक्षेत्रात बालविवाह होणार नाही याची योग्य ती  खबरदारी घ्यावी  आणि बालविवाह झाल्यास संबंधितांवर कडक कार्यवाही करण्यात येईल.

जिल्ह्यातील कोणत्याही ठिकाणी बाल विवाह होणार असल्याबाबतची माहिती मिळताच चाईल्ड हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक 1098 किंवा पोलीस हेल्पलाईन क्रमांक 112 यावर माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.

******

 मुद्रांक शुल्क दंड सवलत अभय योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

 

हिंगोली (जिमाका) दि.27 :  मुद्रांक शुल्क रक्कमेवर आकारण्यात येणाऱ्या दंडामध्ये सवलत देण्याचा शासनाचा मनोदय होता. त्यासाठी शासनाने दि. 1 एप्रिल, 2022 च्या आदेशान्वये शास्तीच्या कपातीची योजना जाहीर केली आहे. ही योजना दि. 1 एप्रिल, 2022 ते 30 नोव्हेंबर, 2022 पर्यंत आठ महिने कार्यान्वित राहणार आहे.

शासनाने आतापर्यंत सन 1994-95, 1997, 1998, 2004 व 2019 मध्ये माफी योजना राबविली आहे. परंतु नव्याने आलेली माफी योजना ही मुद्रांक शुल्काच्या तुटीच्या भागावर देय शास्तीच्या सवलतीसाठी जाहीर करण्यात आली आहे. या योजनेची ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत.

ही योजना अधिसूचनेसोबतच्या परिशिष्टामध्ये नमूद दस्तऐवजांवर उक्त अधिनियमास जोडलेल्या अनुसूची-1 च्या अनुच्छेदांतर्गत आकारणी योग्य असलेल्या मुद्रांक शुल्काच्या तुटीच्या भागावर उक्त अधिनियमाच्या कलम 31 च्या पोटकलम 4 च्या खंड (दोन), कलम 32 अ च्या पोटकलम 2 आणि पोट कलम 4 च्या पहिल्या परंतुकानुसार तसेच कलम 39 च्या पोट कलम 1 च्या खंड (ख) च्या तरतुदीनुसार लागू होणारी एकूण शास्ती ही अटी व शर्तीच्या अधीन राहून दहा टक्केपर्यंत कमी केली आहे. दि. 1 एप्रिल, 2022 ते 31 जुलै, 2022 या कालावधीसाठी असून दि. 1 ऑगस्ट, 2022 ते 30 नोव्हेंबर, 2022 या कालावधीसाठी 50 टक्के कमी केली आहे. ही सवलत 31 मार्च, 2022 रोजी किंवा त्यापूर्वी निष्पादित करण्यात आलेल्या संलेख तथा दस्तांनाच लागू असेल.

या आदेशातील कपात ज्या प्रकरणी चुकवेगिरीची किंवा अडकवून ठेवण्याची किंवा अभिनिर्णयाची कार्यवाही सुरु करण्यात आलेली असेल आणि ज्या प्रकरणी उक्त अधिनियमाची कलमे 31, 32अ, 33, 33अ, 46, 53(1अ) व 53अ यांच्या तरतुदी अन्वये 31 मार्च, 2022 रोजी किंवा त्यापूर्वी पक्षकारावर किंवा निष्पादकावर किमान एक नोटीस बजावण्यात आलेली आहे अशा प्रकरणीच केवळ लागू असेल. तसेच या आदेशाखालील उक्त कपात ज्या प्रकरणी, उक्त अधिनियमाच्या तरतुदीअन्वये कोणत्याही प्राधिकरणासमोर किंवा न्यायालयासमोर अपील किंवा पुनर्विलोकन किंवा पुनरिक्षण अर्ज प्रलंबित आहे अशा प्रकरणी देखील लागू असेल.

ही माफी योजना मुद्रांक तुट व शास्तीची वसुली सुरु आहे अशा प्रकरणांना लागू करण्यात आली आहे. ज्या प्रकरणात मुद्रांक चुकविल्याबाबत वसुलीची अथवा अभिनिर्णयाची कार्यवाही सुरु झाली आहे अशा प्रकरणांना दंड सवलत योजना लागू करण्यात आली आहे.

या माफी योजनेद्वारे विभागात सुरु असलेली दंड प्रकरणे, न्यायालयीन प्रकरणे कमी करुन मुद्रांक व नोंदणी विभागाचा या कामकाजात जाणाऱ्या वेळेत बचत करणे व न्यायालयीन प्रकरणे कमी करणे हा मानस आहे.  या माफी योजनेत मुद्रांक शुल्कावरील दंड रक्कमेत सवलत दिली आहे. तथापि, दस्तावरील मूळ मुद्रांक शुल्काच्या तुटींची पूर्ण रक्कम शासनजमा करणे बंधनकारक आहे. या योजनेचा लाभ घेतांना अर्जदारास विनाशर्त न्यायालयीन प्रकरण मागे घेणे बंधनकारक आहे. ज्या प्रकरणात विभागाने मुद्रांक शुल्क तुटीबाबत आदेश अंतिम केला आहे. अथवा नोटीस दिली आहे त्या रकमेप्रमाणे मुद्रांक शुल्क तूट रक्कम जमा करणे बंधनकारक आहे. त्यानंतर कोणतेही अपील अनुज्ञेय असणार नाही. यासाठी सह जिल्हा निबंधक व मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कक्ष कार्यान्वित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

राज्यातील ज्या प्रकरणात मुद्रांक शुल्क तुट व दंड रक्कम भरणा करणे प्रलंबित आहे. त्या सर्व प्रकरणात नागरिकांनी मुद्रांक व नोंदणी विभागाच्या कार्यालयात संपर्क करुन या दंड सवलत  योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे. मुद्रांक व नोंदणी विभागाच्या www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रकाशने > परिपत्रक > मुद्रांक > अभय योजना या सदराखाली दि. 2 मार्च, 2019 रोजीचा शासन आदेश नागरिकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. अधिक माहितीसाठी मुद्रांक जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात संपर्क साधावा. लवकरच ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल.

याबाबत कोणतीही अडचण असल्यास जिल्ह्याचे सह जिल्हा निबंधक व मुद्रांक जिल्हाधिकारी अथवा विभागाचे 8888007777 या कॉल सेंटरवर व complaint@igrmaharashtra.gov..in  या ई-मेल पत्यावर संपर्क साधावा, असे आवाहन संजय पाटील, सह जिल्हा निबंधक वर्ग-1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.  

****

 मुद्रांक शुल्क दंड सवलत अभय योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

 

हिंगोली (जिमाका) दि.27 :  मुद्रांक शुल्क रक्कमेवर आकारण्यात येणाऱ्या दंडामध्ये सवलत देण्याचा शासनाचा मनोदय होता. त्यासाठी शासनाने दि. 1 एप्रिल, 2022 च्या आदेशान्वये शास्तीच्या कपातीची योजना जाहीर केली आहे. ही योजना दि. 1 एप्रिल, 2022 ते 30 नोव्हेंबर, 2022 पर्यंत आठ महिने कार्यान्वित राहणार आहे.

शासनाने आतापर्यंत सन 1994-95, 1997, 1998, 2004 व 2019 मध्ये माफी योजना राबविली आहे. परंतु नव्याने आलेली माफी योजना ही मुद्रांक शुल्काच्या तुटीच्या भागावर देय शास्तीच्या सवलतीसाठी जाहीर करण्यात आली आहे. या योजनेची ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत.

ही योजना अधिसूचनेसोबतच्या परिशिष्टामध्ये नमूद दस्तऐवजांवर उक्त अधिनियमास जोडलेल्या अनुसूची-1 च्या अनुच्छेदांतर्गत आकारणी योग्य असलेल्या मुद्रांक शुल्काच्या तुटीच्या भागावर उक्त अधिनियमाच्या कलम 31 च्या पोटकलम 4 च्या खंड (दोन), कलम 32 अ च्या पोटकलम 2 आणि पोट कलम 4 च्या पहिल्या परंतुकानुसार तसेच कलम 39 च्या पोट कलम 1 च्या खंड (ख) च्या तरतुदीनुसार लागू होणारी एकूण शास्ती ही अटी व शर्तीच्या अधीन राहून दहा टक्केपर्यंत कमी केली आहे. दि. 1 एप्रिल, 2022 ते 31 जुलै, 2022 या कालावधीसाठी असून दि. 1 ऑगस्ट, 2022 ते 30 नोव्हेंबर, 2022 या कालावधीसाठी 50 टक्के कमी केली आहे. ही सवलत 31 मार्च, 2022 रोजी किंवा त्यापूर्वी निष्पादित करण्यात आलेल्या संलेख तथा दस्तांनाच लागू असेल.

या आदेशातील कपात ज्या प्रकरणी चुकवेगिरीची किंवा अडकवून ठेवण्याची किंवा अभिनिर्णयाची कार्यवाही सुरु करण्यात आलेली असेल आणि ज्या प्रकरणी उक्त अधिनियमाची कलमे 31, 32अ, 33, 33अ, 46, 53(1अ) व 53अ यांच्या तरतुदी अन्वये 31 मार्च, 2022 रोजी किंवा त्यापूर्वी पक्षकारावर किंवा निष्पादकावर किमान एक नोटीस बजावण्यात आलेली आहे अशा प्रकरणीच केवळ लागू असेल. तसेच या आदेशाखालील उक्त कपात ज्या प्रकरणी, उक्त अधिनियमाच्या तरतुदीअन्वये कोणत्याही प्राधिकरणासमोर किंवा न्यायालयासमोर अपील किंवा पुनर्विलोकन किंवा पुनरिक्षण अर्ज प्रलंबित आहे अशा प्रकरणी देखील लागू असेल.

ही माफी योजना मुद्रांक तुट व शास्तीची वसुली सुरु आहे अशा प्रकरणांना लागू करण्यात आली आहे. ज्या प्रकरणात मुद्रांक चुकविल्याबाबत वसुलीची अथवा अभिनिर्णयाची कार्यवाही सुरु झाली आहे अशा प्रकरणांना दंड सवलत योजना लागू करण्यात आली आहे.

या माफी योजनेद्वारे विभागात सुरु असलेली दंड प्रकरणे, न्यायालयीन प्रकरणे कमी करुन मुद्रांक व नोंदणी विभागाचा या कामकाजात जाणाऱ्या वेळेत बचत करणे व न्यायालयीन प्रकरणे कमी करणे हा मानस आहे.  या माफी योजनेत मुद्रांक शुल्कावरील दंड रक्कमेत सवलत दिली आहे. तथापि, दस्तावरील मूळ मुद्रांक शुल्काच्या तुटींची पूर्ण रक्कम शासनजमा करणे बंधनकारक आहे. या योजनेचा लाभ घेतांना अर्जदारास विनाशर्त न्यायालयीन प्रकरण मागे घेणे बंधनकारक आहे. ज्या प्रकरणात विभागाने मुद्रांक शुल्क तुटीबाबत आदेश अंतिम केला आहे. अथवा नोटीस दिली आहे त्या रकमेप्रमाणे मुद्रांक शुल्क तूट रक्कम जमा करणे बंधनकारक आहे. त्यानंतर कोणतेही अपील अनुज्ञेय असणार नाही. यासाठी सह जिल्हा निबंधक व मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कक्ष कार्यान्वित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

राज्यातील ज्या प्रकरणात मुद्रांक शुल्क तुट व दंड रक्कम भरणा करणे प्रलंबित आहे. त्या सर्व प्रकरणात नागरिकांनी मुद्रांक व नोंदणी विभागाच्या कार्यालयात संपर्क करुन या दंड सवलत  योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे. मुद्रांक व नोंदणी विभागाच्या www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रकाशने > परिपत्रक > मुद्रांक > अभय योजना या सदराखाली दि. 2 मार्च, 2019 रोजीचा शासन आदेश नागरिकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. अधिक माहितीसाठी मुद्रांक जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात संपर्क साधावा. लवकरच ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल.

याबाबत कोणतीही अडचण असल्यास जिल्ह्याचे सह जिल्हा निबंधक व मुद्रांक जिल्हाधिकारी अथवा विभागाचे 8888007777 या कॉल सेंटरवर व complaint@igrmaharashtra.gov..in  या ई-मेल पत्यावर संपर्क साधावा, असे आवाहन संजय पाटील, सह जिल्हा निबंधक वर्ग-1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.  

****

 


महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमात

संबंधित विभागाने आपणास दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी

- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

 

हिंगोली, (जिमाका) दि. 27 : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 62 व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते दिनांक 1 मे रोजी येथील पोलिस कवायत मैदानावर सकाळी 8.00 वाजता होणार आहे. हा समारंभ यशस्वी होण्यासाठी प्रत्येक विभागाने दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत. 

महाराष्ट्र दिन साजरा करण्याच्या अनुषंगाने येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित पूर्वतयारीच्या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी पांडूरंग बोरगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, उपजिल्हाधिकारी कमलाकर फड, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के, तहसीलदार नवनाथ वगवाड, नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ.अजय कुरवाडे आणि सर्व संबंधित विभागातील अधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्र दिनाचा मुख्य समारंभ यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रत्येक शासकीय विभागाला जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्या सर्व विभागानी आपली जबाबदारी योग्यपणे व इतर विभागाशी समन्वय ठेवून पार पाडावी. सर्वजनिक बांधकाम विभागाने पोलीस मुख्यालयावर मुख्य ध्वजारोहणाच्या अनुषंगाने मंडप, मैदानाची दुरुस्ती, ध्वजस्तंभाची रंगरंगोटी या व इतर आवश्यक सुविधांचे नियोजन करावे.  त्याप्रमाणेच मुख्य कार्यक्रमात पथ संचलनात सहभागी होणाऱ्या पोलीस कर्मचारी व विद्यार्थी तसेच नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी यावेळी संबंधितांना दिल्या.

****

26 April, 2022

 

अन्न व्यावसायिकांनी वार्षिक परतावा

 31 मे पूर्वी ऑनलाईन दाखल करण्याचे आवाहन

 

हिंगोली (जिमाका) दि.26 :  अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 व अन्न सुरक्षा व मानदे अन्न व्यावसायिक यांचे परवाना व नोंदणी नियमन 2011 मधील नियम 2.1.13 (1) नुसार सर्व उत्पादक, रीप्याकर व आयातदार यांना प्रत्येक वर्षाच्या 31 मे पूर्वी आपल्या अन्न व्यवसायाचा वार्षिक परतावा सादर करावयाचा असतो. आर्थिक वर्ष 2021-22 पासून हा वार्षिक परतावा सर्व उत्पादक, रीप्याकर व आयातदार यांनी ऑनलाईन पध्दतीने सादर करावायाचा आहे. वार्षिक परतावा सर्व अन्न व्यावसायिकांनी foscos.fssai.gov.in  या प्रणालीवर  जाऊन आपल्या अकाऊंट वरुन अथवा फाईल एक्सप्रेस ॲन्युअल रिटर्न या टॅबवर जाऊन ऑनलाईन पध्दतीने भरावयाचा आहे.

हिंगोली जिल्ह्यातील सर्व उत्पादक, रिप्याकर व आयातदार यांनी 2021-22 या आर्थिक वर्षाचा वार्षिक परतावा फॉर्म डी-1 मध्ये ऑनलाईन पध्दतीने 31 मे, 2022 पर्यंत दाखल करावयाचा आहे. 31 मे नंतर प्रत्येक दिवसाला 100 रुपये याप्रमाणे  विलंब शुल्क  भरुनच वार्षिक परतावा  सादर करावा लागेल.

तसेच 2020-21 या आर्थिक वर्षाचा  वार्षिक परतावा फॉर्म डी 1 मध्ये जागतिक कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे 31 ऑगस्ट 2021 पर्यंत भरण्यासाठी मुदत देण्यात आली होती. परंतु जिल्ह्यातील  बरेच अन्न उत्पादक,  रीप्याकर व आयातदार यांनी आपला वार्षिक  परतावा फॉर्म डी 1 मध्ये 31 ऑगस्ट 2021 पर्यंत दाखल केलेला नाही. त्यांनी वार्षिक परतावा  फॉर्म डी 1 मध्ये ऑनलाईन  पध्दतीने जो काही दंड, शुल्क असेल त्या दंड व शुल्कासहीत  दाखल करावा.

सन 2020-21 या आर्थिक वर्षाचा वार्षिक परतावा ऑनलाईन  पध्दतीने सादर न करणाऱ्या अन्न उत्पादक, रीप्याकर व आयातदार यांच्याविरुध्द अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 नियम व नियमन 2011 मधील तरतुदीनुसार योग्य ती कारवाई प्रस्तावित करण्यात येईल. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व अन्न उत्पादक, रिप्याकर व आयातदार यांनी वार्षिक परतावा 31 मे,202 पर्यंत भरावा,  असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त नारायण सरकटे यांनी केले आहे.     

****

 

राष्ट्रीय लोकअदालतीचे 7 मे रोजी आयोजन

 

हिंगोली (जिमाका) दि.26 :  येथील जिल्हा न्यायालयात व त्या अंतर्गत येणाऱ्या विविध न्यायालयात तालुका विधी सेवा समिती व वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 7 मे 2022 रोजी सकाळी 10.30 वाजता न्यायालय परिसरात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

या लोकअदालतीमध्ये भूसंपादन व मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, तडजोड युक्त फौजदारी प्रकरणे, दिवाणी प्रकरणे, वैवाहिक/ कौटुंबिक वाद प्रकरणे, पराक्रम्य अभिलेख अधिनियमचे कलम 138 खालील प्रकरणे, वादपूर्व प्रकरणे इत्यादी खटले तडजोडीसाठी ठेवण्यात आलेली आहेत.  ही सर्व प्रकरणे आपआपसातील तडजोडीद्वारे निकाली काढता यावीत. यासाठी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या राष्ट्रीय लोकअदालतीचा जास्तीत जास्त पक्षकारांनी फायदा घ्यावा, असे आवाहन जिल्हा न्यायाधीश तथा तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष एन.बी. शिंदे, वकील संघाचे अध्यक्ष मतीन पठाण यांनी केले आहे.

*****

 

बांधकाम कामगारांनी दलालांच्या भूलथापांना बळी पडू नये

सरकारी कामगार अधिकारी यांचे आवाहन

 

हिंगोली (जिमाका) दि.26 :  महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई जिल्हा हिंगोली मार्फत जिल्ह्यातील पात्र बांधकाम कामगारांची नोंदणी व नुतनीकरण, विविध योजनेचे लाभ वाटप, आरोग्य तपासणी, मध्यान्ह भोजन तसेच सुरक्षा संच व अत्यावश्यक संच वाटपाचे काम पारदर्शक पध्दतीने केले जाते.

जिल्ह्यातील नोंदीत बांधकाम कामगारांनी कोणत्याही दलालाच्या भूलथापांना बळी पडू नये किंवा आर्थिक देवाण-घेवाण करु नये, सर्व सुविधा ह्या मोफत आहेत. काही अडचण असल्यास बांधकाम कामगारांनी जिल्हा कामगार सुविधा केंद्र, द्वारा राजेश बालदी यांचे निवासस्थान "मातोश्री" बिल्डींग, तथागत उद्यानाजवळ (धुमाळ हॉस्पीटलजवळ) एन.टी.सी. हिंगोली , मो. क्र. 8788994961 येथे संपर्क करावा, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी टी.ई. कराड यांनी केले आहे.

****

22 April, 2022

 

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांचे

बँक खाती तात्काळ आधार संलग्न करावेत

 

हिंगोली (जिमाका),  दि. 22 :  प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत नोंदणीकृत लाभार्थ्यांना माहे एप्रिल, 2022 नंतर जमा होणारे सर्व हप्ते हे आधार संलग्न बँक खात्यात अदा करणार असल्याने सर्व लाभार्थ्यांनी बँक खाती तात्काळ आधार संलग्न करावेत, असे निर्देश राज्याच्या कृषि आयुक्तांनी दिलेले आहेत. तसेच ज्या लाभार्थ्यांचा डाटा एनपीसीआयशी आधार लिंक नसल्यास लाभार्थ्यांना एप्रिल नंतरचे हप्ते अदा होणार नाहीत.

त्यामुळे एकही शेतकरी लाभापासून वंचित राहणार नाही. यासाठी जिल्हा अग्रणी बँकेच्या समन्वयाने शिबिराचे (कॅम्प) आयोजन करुन प्रधान मंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांचा डाटा एनपीसीआयशी आधार लिंक करण्याचे काम करावे, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी सर्व संबंधित यंत्रणेला दिले आहेत.

******

 

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना

किसान क्रेडीट कार्ड देण्यासाठी ‘‘किसान भागीदारी प्राथमिकता हमारी’’मोहिमेचे आयोजन

 

हिंगोली (जिमाका),  दि. 22 :  भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा अंतर्गत आत्मनिर्भर भारताचा एक भाग म्हणून केंद्र शासनाच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयामार्फत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना किसान क्रेडीट कार्ड उपलब्ध करुन देण्यासाठी दि. 24 एप्रिल ते 1 मे, 2022 या कालावधीत ‘‘किसान भागीदारी प्राथमिकता हमारी’’ मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेचा जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.

किसान भागीदारी प्राथमिकता हमारी ही मोहिम दि. 24 एप्रिल ते 1 मे, 2022 या कालावधीत देशभरात राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत प्राधान्याने प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

हिंगोली जिल्ह्यात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे 01 लाख 90 हजार लाभार्थ्यांपैकी 01 लाख 40 हजार शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डाचे वाटप करावयाचे आहे. यासाठी 24 एप्रिल रोजी सर्व ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष ग्रामसभेत किसान क्रेडिट कार्ड देण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज वाटप करण्यात येईल. पात्र शेतकऱ्यांनी विहित नमुन्यात भरलेले अर्ज ग्रामसेवकांच्या मार्फत बँक शाखेमध्ये जमा करावयाचे आहेत.

ही मोहिम जिल्हा अग्रणी बँक, नाबार्ड, महसूल, सहकार, ग्रामविकास, कृषी , पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्य विभाग या सर्व यंत्रणांच्या समन्वयाने यशस्वीपणे राबविण्यात येणार आहे. यासाठी सर्व संबंधित बँकांनी किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करुन देण्याच्या विहित कार्यपध्दतीनुसार पात्र लाभार्थ्यांचे अर्ज विशेष ग्रामसभेत ग्राम सेवकांच्या मार्फत घेऊन त्यांना किसान क्रेडिट कार्ड मंजूर करण्याची कार्यवाही पूर्ण करावी. तसेच योजनेतील लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करुन देण्याची आणि त्यांचे प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ मिळत असलेले बँक खाते आधार प्रमाणित पेमेंटसाठी अधिकृत करुन घेण्याची कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सर्व संबंधित बँकांना दिलेल्या आहेत.

******

21 April, 2022

 





शेतकरी  ते थेट ग्राहक फळ पीक विक्री स्टॉलचे

राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते उद्घाटन

 

 

हिंगोली (जिमाका),  दि. 21 :  जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व औंढा  तालुका कृषी अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने औंढा शहरातील जिंतूर टी पॉईंट येथे विकेल ते पिकेल योजनेअंतर्गत शेतकरी ते थेट ग्राहक फळ पीक विक्री स्टॉलचे उद्घाटन राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी कृषी मंञी दादाजी भुसे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.

तसेच या आर्थिक वर्षांमध्ये ज्या शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरण अंतर्गत शेती अवजारे ट्रॅक्टर, रोटावेटर, मळणीयंत्र , नांगर , पावर टिलर , पेरणी यंत्र दिले आहे, अशा  70  शेतकऱ्यांचा  कृषी मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी लातूर विभागाचे विभागीय कृषि सहसंचालक एस. के. दिवेकर, जिल्हा अधीक्षक  कृषी अधिकारी शिवराज घोरपडे, उपविभागीय कृषी अधिकारी  एस. व्ही. लाडके, औंढ्याचे तालुका कृषी अधिकारी बबनराव वाघ यांच्यासह औंढा तालुक्यातील शेतकरी व कृषी अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी उपस्थित होते.

******

 





कृषीमंत्री  दादा भुसे यांच्या हस्ते गोळेगाव येथील कृषी महाविद्यालय इमारतीचे उद्घाटन

शेतकऱ्यांना खताचा तुटवडा होऊ दिला जाणार नाही

- कृषि मंत्री दादाजी भुसे

* प्रत्येक महिलांनी स्वावलंबी बनण्यासाठी बचत गटामार्फत लघु उद्योग सुरु करावा

हिंगोली (जिमाका),  दि. 21 :  शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत खताचा तुटवडा होऊ दिला जाणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी आज केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी अंतर्गत असलेल्या औंढा नागनाथ तालुक्यातील गोळेगाव येथील कृषि महाविद्यालयाच्या इमारतीचे व महिला शेतकरी परिसंवाद कार्यक्रमाचे उद्घाटन आज राज्याचे कृषी, माजी सैनिक कल्याण मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते झाले . त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.अशोक  ढवण हे होते. यावेळी आमदार डॉ. राहुल पाटील, तहसीलदार डॉ.कृष्णा कानगुले, जिल्हा परिषद सदस्य अंकुश आहेर, नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव, परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे शिक्षण संचालक तथा अधिष्ठाता डॉ. धर्मराज गोखले, अभियंता दिगंबर पोतरे, गोळेगाव येथील कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ.भगवान आसेवार हे उपस्थित होते.

यावेळी कृषी मंत्री  दादाजी भुसे म्हणाले, शेतकऱ्यांना खताचा तुटवडा होऊ दिला जाणार नाही. शेतामधील वन्य प्राण्यापासून होणारे पिकांचे नुकसान टाळण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांनी शेतीच्या कडेला काटेरी झाडे लावून वन्य प्राण्यांपासून आपले पीक वाचण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

बचत गटातील महिलांना परिसंवादात मार्गदर्शन करताना कृषी मंत्री श्री.भुसे म्हणाले, प्रत्येक महिलांनी स्वावलंबी बनण्यासाठी बचत गटाच्या माध्यमातून लघु उद्योग सुरु करावेत. या लघु उद्योगातून तयार केलेला माल विक्रीसाठी बाजारपेठेमध्ये आणावा. त्यासाठी  स्वतंत्र जागा देण्याबरोबरच प्रत्येक महिला बचत गटाला बँकेमार्फत कर्ज उपलब्ध करुन देण्यात येईल,असेही त्यांनी सांगितले.

याप्रसंगी कृषी मंत्री दादा भुसे यांनी इमारतीचे उद्घाटन झाल्यानंतर इमारतीच्या परिसराची पाहणी केली व  कुलगुरु, प्राचार्य व प्राध्यापक यांचे कौतुकही केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. डॉ.संतोष वाघमारे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. पुंडलिक वाघमारे यांनी केले. यावेळी कृषि महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी, औंढा तालुक्यातील बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.  

*****