08 April, 2022

 


विद्यार्थ्यांनी स्वाधारच्या आधारावर निश्चित ध्येय ठेवून यश संपादन करावे

- उपविभागीय पोलिस अधिकारी विवेकानंद वाखारे

 

हिंगोली, दि. 08  (जिमाका) :  भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर 'स्वाधार' योजनेमुळे मागासवर्गीय विध्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनाला मोठा आधार मिळत असून विध्यार्थ्यांनी कठोर परिश्रमातून निश्चित एक ध्येय ठेऊन जीवनात मोठं यश संपादन केले पाहिजे, असे मत हिंगोली ग्रामीणचे उपविभागीय पोलिस अधिकारी विवेकानंद वाखारे, यांनी  सामाजिक न्याय भवन येथे जयंती  सामाजिक समता कार्यक्रमात बोलतांना व्यक्त केले.

          सामाजिक न्याय भवनात आज दि. 8 एप्रिल रोजी दुपारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सामाजिक कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्पपूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी  उपविभागीय पोलिस अधिकारी विवेकानंदजी वाखारे, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे, बार्टीचे प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ गोवंदे, राष्ट्रवादीचे प्रफूल सोनवणे यांच्या हस्ते  स्वाधार योजनेतील पात्र लाभार्थी विध्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते लाभपत्र वाटप करण्यात आले.

            यावेळी उपस्थित विध्यार्थ्यांना बार्टीचे प्रकल्प अधिकारी गोवंदे यांनी बार्टीच्या योजनाची माहिती सांगितली, लाभार्थी विध्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समतादूत अशोक इंगोले यांनी केले. तर शेवटी  प्रफूल पटेबहादूर यांनी उपस्थिताचे आभार मानले.

कार्यक्रमास समाजकल्याणचे कर्मचारी अनंत बिजले, समतादूत  सुरेश पठाडे, सखाराम चव्हाण, रितेश बगाटे, वडकुते, बिहाडे, पौळकर आदीसह विविध महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

*****

No comments: